महानिर्मिती तंत्रज्ञ-३ भरतीत मोठा भ्रष्टाचार? निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न
अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरल्याची चर्चा सुरू असून, निवड प्रक्रिया संगनमताने पार पडल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. राज्यभर संतापाचा ज्वालामुखी फुटला या प्रकरणावर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर जोरदार संताप व्यक्त केला आहे. पारदर्शक निकाल आणि गुणपत्रिका तात्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. परीक्षार्थ्यांचा आरोप आहे की, निकाल जाहीर करताना गुण लपवले म्हणजे काहीतरी काळ कारस्थान आहे. हे विद्यार्थ्यांशी केलेले उघडपणे अन्याय आहे. सरकार आणि महाजेनको गप्प का? भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेवर राज्य सरकार आणि महाजेनको प्रशासन अद्याप मौन बाळगून आहे.
काही दिवसांपूर्वीच सरकारने ‘भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण होईल’ असे आश्वासन दिले होते, मात्र आता या निकालामुळे ते आश्वासन कोरे ठरल्याचे दिसत आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून या प्रकरणात चौकशीची मागणी होत आहे. ‘निकाल पारदर्शकतेने जाहीर करा, गुण आणि उत्तरतालिका सार्वजनिक करा, नाहीतर राज्यभर तीव्र आंदोलन होईल,’ असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. एकूणच, महाजेनको तंत्रज्ञ-३ भरतीचा निकाल हा विद्यार्थ्यांसाठी केवळ निकाल नसून पारदर्शकतेवरील विश्वासाचा कस आहे. सरकारने करून सत्य बाहेर आणले नाही, तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप तर हा आणखी एक ‘भरती घोटाळा’ म्हणून इतिहासात नोंदवला जाण्याची शक्यता आहे.






