फोटो सौजन्य - Social Media
इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने 2025 साठी प्रोफेसर आणि डेटा Analist पदांसाठी भरती जाहीर केली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरली जाणार असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा तपासून पाहाव्यात.
या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रोफेसर पदासाठी 47 ते 55 वर्षे, तर डेटा Analist पदासाठी 23 ते 30 वर्षे वयोमर्यादा आहे (1 एप्रिल 2025 पर्यंत). निवड प्रक्रियेत प्रोफेसर पदासाठी सादरीकरण, गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखत, तर डेटा Analist साठी लेखी परीक्षा, गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असेल. उमेदवारांनी आपली पात्रता आणि अनुभव तपासून मगच अर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर “Professor & Data Analyst Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करून नाव, ई-मेल आणि फोन नंबरद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे आणि सर्व माहिती तपासून अर्ज अंतिमरित्या सबमिट करावा. अर्जाची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे.
IBPS ने अर्ज सुरू होण्याची व शेवटच्या तारखेची माहिती जाहीर केली आहे. १ एप्रिल २०२५ रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली असून याच दिवशी उमेदवारांना अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना २१ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. परीक्षेचे आयोजन मे २०२५ मध्ये करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. या भरतीसाठी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि इतर आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी IBPS द्वारे मिळणारी ही संधी महत्त्वाची असून, इच्छुकांनी आवश्यक तयारी करून अर्ज करावा.