• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Pare Mare And The Student Sports Center Win The Championship

परे, मरे, विद्यार्थी क्रीडा केंद्राला विजेतेपद! शेवटपर्यंत दिली झुंज

६२व्या व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुरुष गटात मध्य रेल्वे, महिला गटात पश्चिम रेल्वे विजेते ठरले. ४ फूट ११ इंच मुलांच्या प्रायोगिक गटात यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राने अजिंक्यपद पटकावले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 30, 2026 | 04:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

६२व्या व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत चुरशीच्या आणि थरारक लढती पाहायला मिळाल्या. पुरुष व्यावसायिक गटात मध्य रेल्वे, महिला व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वे, तर ४ फूट ११ इंच मुलांच्या प्रायोगिक गटात यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राने अजिंक्यपद पटकावत स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली.

महाराष्ट्रातील ‘या’ लोकनेत्यांचे शिक्षण किती होते? शिक्षणाने नव्हे तर कामाने ओळखले जाणारे नेतेcd  

पुरुष व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पश्चिम रेल्वेला अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभूत करत विजेतेपद मिळवले. मध्य रेल्वेने २.४० मिनिटे राखून ठेवत १३-१२ असा १ गुणाने विजय नोंदवला. सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीत मध्य रेल्वेच्या विजयात दिलीप खांबी, मिलिंद चावरेकर, विजय हजारे आणि अरपाटणकर यांनी निर्णायक भूमिका बजावली. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेकडून महेश शिंदे, ऋषभ वाघ, निखिल सोडये, राहुल मंडल आणि मझहर जमादार (प्रत्येकी ३ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला.

महिला व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने आक्रमक खेळाचे दमदार प्रदर्शन करत रचना नोटरी वर्क्स संघावर वर्चस्व गाजवले. पश्चिम रेल्वेने ६-४ असा एक डाय राखून २ गुणांनी दणदणीत विजय मिळवत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. विजेत्या पश्चिम रेल्वेकडून संध्या सुरवसे, अर्चना मांजी, तेजस्विनी के. आर., दिव्या गायकवाड, किशोरी मोकाशी, कल्याणी कंक आणि सुहानी धोत्रे यांनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडवले. पराभूत- शेवटपर्यंत दिली झुंज रचना नोटरी वर्क्स संघाकडून साक्षी वाफेलकर, गीतांजली नरस्राळे आणि साक्षी तोरणे यांनी लढाऊ खेळ केला, मात्र मोठा पराभव टाळण्यातच त्यांना समाधान मानावे लागले.

राजकारणी होण्यासाठी शिक्षित असणे किती महत्त्वाचे? खरंच शिक्षण गरजेचं आहे का? जाणून घ्या

स्पर्धेतील सर्वात थरारक सामना ४ फूट ११ इंच मुलांच्या प्रायोगिक निमंत्रित गटात पाहायला मिळाला. अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्र आणि ओम साईश्वर सेवा मंडळ यांच्यात ५-५ अशी बरोबरी झाली. पूर्वार्धात २-२, उत्तरार्धात १-१ आणि जादा डावातही २-२ अशी समान स्थिती निर्माण झाली. अखेर लघुत्तम आक्रमणाच्या आधारे विद्यार्थी क्रीडा केंद्राने ४.४९ मिनिटे राखून ठेवत धरारक विजय मिळवला. विद्यार्थी क्रीडा केंद्राकडून विग्नेश जाधव, ओमकार जाधव आणि कार्तिक चोडणकर यांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला. ओम साईश्वर सेवा मंडळाकडून सार्थक गामी, आरव साटम आणि श्लोक जाधव यांनी शेवटपर्यंत दिलेली झुंज प्रेक्षकांच्या टाळ्यांची कमाई करून गेली. या स्पर्धेमुळे जिल्हा स्तरावरील खो-खो खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली असून, पुढील स्पर्धांसाठीही खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.

Web Title: Pare mare and the student sports center win the championship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Career News
  • Sports News

संबंधित बातम्या

‘क्रांतिज्योती विद्यालय’ सिनेमा करमुक्त करा! शिक्षण क्रांती संघटनेची आशिष शेलार यांच्याकडे धाव
1

‘क्रांतिज्योती विद्यालय’ सिनेमा करमुक्त करा! शिक्षण क्रांती संघटनेची आशिष शेलार यांच्याकडे धाव

गावकऱ्यांच्या दातृत्वातून बेंदेवाडी शाळेचा ‘कायापालट’; पालकसभेतच जमा केली दीड लाखांची रोख रक्कम!
2

गावकऱ्यांच्या दातृत्वातून बेंदेवाडी शाळेचा ‘कायापालट’; पालकसभेतच जमा केली दीड लाखांची रोख रक्कम!

Most Dangerous Jobs :  भारतातील सर्वात भायनक जॉब; ‘इथे’ काम करणं बेतू शकतं जिवावर
3

Most Dangerous Jobs : भारतातील सर्वात भायनक जॉब; ‘इथे’ काम करणं बेतू शकतं जिवावर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
परे, मरे, विद्यार्थी क्रीडा केंद्राला विजेतेपद! शेवटपर्यंत दिली झुंज

परे, मरे, विद्यार्थी क्रीडा केंद्राला विजेतेपद! शेवटपर्यंत दिली झुंज

Jan 30, 2026 | 04:04 PM
प्रजासत्ताक दिनानिमित्त क्लासिक लेजेंड्सच्या ‘नोमॅड्स’ राईडमध्ये देशभरातील २,००० हून अधिक रायडर्स सहभागी

प्रजासत्ताक दिनानिमित्त क्लासिक लेजेंड्सच्या ‘नोमॅड्स’ राईडमध्ये देशभरातील २,००० हून अधिक रायडर्स सहभागी

Jan 30, 2026 | 03:58 PM
Bangladesh Election: इतिहासात पहिल्यांदाच घडलं! जमात-ए-इस्लामीने हिंदू नेत्याला दिले निवडणुकीचे तिकीट; भारताची रणनीतीच गुपित

Bangladesh Election: इतिहासात पहिल्यांदाच घडलं! जमात-ए-इस्लामीने हिंदू नेत्याला दिले निवडणुकीचे तिकीट; भारताची रणनीतीच गुपित

Jan 30, 2026 | 03:54 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
IND vs NZ 4th T20I : ‘सुधारित मानसिकतेमुळे अर्धशतकी खेळी…’, चौथ्या सामन्यात स्फोटक खेळी करणाऱ्या शिवम दुबेने केला मोठा खुलासा 

IND vs NZ 4th T20I : ‘सुधारित मानसिकतेमुळे अर्धशतकी खेळी…’, चौथ्या सामन्यात स्फोटक खेळी करणाऱ्या शिवम दुबेने केला मोठा खुलासा 

Jan 30, 2026 | 03:51 PM
AR Rahman ने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये घेतली धमाकेदार एन्ट्री, लता मंगेशकरांच्या सीडीवर हात ठेवून घेतली शपथ, पाहा मजेदार Promo

AR Rahman ने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये घेतली धमाकेदार एन्ट्री, लता मंगेशकरांच्या सीडीवर हात ठेवून घेतली शपथ, पाहा मजेदार Promo

Jan 30, 2026 | 03:50 PM
गांधी बालमंदिरमध्ये छात्र सेना दिन! विद्यार्थ्यांनी दिमाखदार संचलन करून NCC ध्वजास दिली मानवंदना

गांधी बालमंदिरमध्ये छात्र सेना दिन! विद्यार्थ्यांनी दिमाखदार संचलन करून NCC ध्वजास दिली मानवंदना

Jan 30, 2026 | 03:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM
Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Jan 29, 2026 | 07:50 PM
Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:33 PM
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:21 PM
Raigad :  पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Raigad : पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Jan 29, 2026 | 07:14 PM
Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Jan 29, 2026 | 04:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.