फोटो सौजन्य - Social Media
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ज्युनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) या लिपिक संवर्गातील भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती CRPD/CR/2025-26/06 या जाहिरातीनुसार होत असून, एकूण 5583 लिपिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती केवळ एका राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी आहे आणि उमेदवाराने अर्ज करताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया 6 ऑगस्ट 2025 पासून 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.
या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर (Graduate) असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2025 रोजी 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गासाठी वयातील सवलत लागू आहे. OBC साठी 3 वर्षे, SC/ST साठी 5 वर्षे, PwBD साठी 10 ते 15 वर्षे, तर माजी सैनिक आणि विधवा/घटस्फोटित महिलांसाठी अधिक सवलत देण्यात आली आहे. अर्ज शुल्क सामान्य/OBC/EWS वर्गासाठी ₹750 आहे, तर SC/ST/PwBD/Ex-Servicemen यांच्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये होईल
पूर्व परीक्षा सप्टेंबर 2025 मध्ये तर मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.sbi.co.in वर जाऊन “Careers” विभागात अधिक माहिती व अर्जाची लिंक तपासावी.
ही भरती बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करून योग्य तयारी करून आपले स्वप्न साकार करावे.