फोटो सौजन्य - Social Media
NPCIL मध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. न्यूक्लियर पावर कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने या भरतीला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण २८४ पदे भरण्यात येणार आहे. ट्रेंड अप्रेंटिस पदासाठी एकूण १७६ जागा रिक्त आहेत. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी ३२ जागा रिकामी आहेत तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ७६ जागा रिकामी आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरण्यात येणार आहे. फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकेनिक, वेल्डर, इंस्ट्रूमेंट मेकेनिक, मशीनिस्ट, टार, एसी मेकेनिक या पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
अशा प्रकारे करता येईल अर्ज
डिप्लोमा अप्रेन्टिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित शाखेत डिप्लोमा समकक्ष कोणत्याही राज्य सरकार/ विद्यापीठ किंवा राज्य किंवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून राज्य परिषद आणि तांत्रिक शिक्षण मंडळाकडून इंजिनिअरिंग किंवा तांत्रिक डिप्लोमा प्राप्त करणारे अर्ज करू शकतात. ग्रॅज्युएट अप्रेन्टिस पदांसाठी एआयसीटीई/ यूजीसी/ राज्य सरकार/ केंद्र सरकार द्वारा मान्यताप्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठातून मान्यताप्राप्त इंजिनिअरिंग तंत्रज्ञान किंवा सामान्य शाखा जसे की बीए, बीएससी, बीकॉम इत्यादीमध्ये पदवी प्राप्त करणारे अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. ट्रेड अप्रेन्टिस पदांसाठी आवश्यक पात्रतेचे तपशील अधिसूचनेतून मिळवा.
एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी किमान आयु वयोगट १८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी वयोगट २४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी २५ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. तर पदवीधरांसाठी २६ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदासाठी नियुजत उमेदवाराला प्रतिमाह ७,७०० रुपये देण्यात येईल. डिप्लोमा अप्रेंटीस पदासाठी ८,००० रुपये वेतन देण्यात येईल. तर पदवीधर असणाऱ्या अप्रेंटिस पदासाठी ९,००० रुपये वेतन देण्यात येईल. शैक्षणिक योग्यतेच्या अनुसार तयार करण्यात आलेल्या मेरिट लिस्टच्या आधारवर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.
निर्धारित पात्रता शर्ती पूर्ण करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट npcil.nic.in वर जाऊन अर्ज फॉर्म डाउनलोड करू शकतात तसेच भरलेला अर्ज डाक किंवा स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर पाठवू शकतात –
उप व्यवस्थापक (एचआरएम), एनपीसीआयएल, काकरापार गुजरात साइट, अनुमाला-394651, ता. व्यारा, जिल्हा. तापी, गुजरात. अंतिम तारीख २१ जानेवारी, २०२५ निश्चित करण्यात आली आहे.