केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण या येत्या रविवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पनावर सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून तुम्हाला माहिती आहे का? केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अर्थ मंत्रालयात हलवा समारंभ पार पडतो. ही एक महत्त्वाची परंपरा असून यात अर्थमंत्र्यांद्वारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये हलवा वाटलं जातो. पण असे का केले जाते? यामागे काही रंजक कारणे दडलेली आहेत जी आज आपण जाणून घेणार आहोत.
बजेट जाहीर होण्यापूर्वी हलवा का वाटला जातो? कधीपासून सुरु झाली ही परंपरा? जाणून घ्या

कोणताही शुभ कार्य गोड पदार्थाने सुरू करण्याच्या भारतीय परंपरेनुसार, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीही हलवा समारंभ आयोजित केला जातो. (फोटो सौजन्य: X)

यानुसार, अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉकमधील एका मोठ्या कढईत हलवा तयार केला जातो आणि बजेट तयार करणाऱ्या संपूर्ण टीमला तो सर्व्ह केला जातो. (फोटो सौजन्य: X)

अर्थ मंत्रालयाने आयोजित केलेल्या या समारंभाचा मुख्य उद्देश अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे आहे. (फोटो सौजन्य: X)

अनेक दशकांपासून हलवा समारंभाची परंपरा चालत आली आहे. हा समारंभ दरवर्षी बजेटच्या साधारण ७-१० दिवस आधी पार पडतो. (फोटो सौजन्य: SBI)

या विधीत केंद्रीय अर्थमंत्री स्वतः उपस्थित राहतात आणि संपूर्ण टीमला हलवा खाऊ घालून संघाचे मनोबल वाढवतात. (फोटो सौजन्य: X)






