महाजनकोमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती; 'ही' असेल अर्ज करण्याची शेवटची मुदत!
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडअंतर्गत मोठी भरती जाहीर निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्थापत्य अभियंता, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, यांत्रिक अभियंता पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड
भरली जाणारे पदे
1. स्थापत्य अभियंत
2. इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता
3. यांत्रिक अभियंता
एकूण रिक्त पद संख्या – 39 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
हेही वाचा – पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! DRDO अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, वाचा… सविस्तर
कुठे पाठवाल अर्ज
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप महाव्यवस्थापक (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कं. लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई -400 019
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024
वयोमर्यादा – 57 वर्षे
भरतीचा तपशील
स्थापत्य अभियंता – 13 जागा रिक्त
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता – 13 जागा रिक्त
यांत्रिक अभियंता – 13 जागा रिक्त
हेही वाचा – नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्डमध्ये मोठी भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारिख!
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता – Β.Ε./B.Tech (Civil)
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता – Β.Ε./ B.Tech (Electrical/ Electronics)
यांत्रिक अभियंता – Β.Ε./ B.Tech(Mechanical)
हेही वाचा – अहमदनगर महापालिकेत व्हेटर्नरी डॉक्टर पदासाठी भरती; मिळणार 50,000 रुपये पगार
कसा कराल अर्ज
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडच्या स्थापत्य अभियंता, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, यांत्रिक अभियंता पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वरती दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात – https://mahagenco.in/wp-content/uploads/2024/08/Advt-No-11_2024.pdf
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://mahagenco.in/ ला भेट द्या.