प्राध्यापक पदभरती न केल्यास आंदोलनाचा इशारा (फोटो- istockphoto)
प्राध्यापक पदभरती न केल्यास आंदोलनाचा इशारा
पदभरती संदर्भात गेल्या २ वर्षांपासून गोंधळ सुरू
प्राध्यापकांच्या ५ हजार ११२ जागांना वित्त विभागाची मान्यता
पुणे: राज्यातील विद्यापीठ स्तरावर प्राध्यापक पदभरती संदर्भात गेल्या २ वर्षांपासून जो गोंधळ सुरू आहे. दि. ६ ऑक्टाबर २०२५ चा शासन निर्णयामुळे वाढला आहे. यामध्ये ८०-२०, ७५-२५, ६०-४० सूत्र असे प्रयोग चालणार नाही, तर विद्यापीठ आनुदान आयोगाच्या निर्देशानूसार ५०-५०% हाच फार्मुला असला पाहीजे यामध्ये राज्याने हस्तक्षेप करून पदभरती लांबवू नये. प्राध्यापक पदभरती लवकर करावी नाहीतर आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने दिला.
अकृषी विद्यापीठातील अनुदानित महाविद्यालयातील एकुण रिक्त पदांच्या ४०% नुसार ५ हजार १२ सहा. प्राध्यापक पदांची पद भरती संदर्भात उच्च शिक्षण विभाग ३ वर्षापासून विभाग वित्त विभागाच्या नावावर खापर फोडत होते मात्र, आता जर वित्त विभागाने परवानगी दिलेली आहे. तर कसला मुहुर्त राज्य सरकार पाहत आहे. हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. असे संदीप पाथ्रीकर यांनी संगीतले.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील प्राध्यापकांच्या ५ हजार ११२ जागांना वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. तसेच, ‘६०-४०’ सूत्राला कुलपतींनीही मान्यता दिली आहे. त्यानुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, पीएच.डी., संशोधन लेख आदींसाठी ६० गुण; तर उर्वरित ४० पैकी २० गुण मुलाखतीला आणि २० गुण अध्यापन प्रात्यक्षिक याला असेल.
सहाय्यक प्राध्यापकांची राज्यात १३ हजार पदे रिक्त आहे या पदांच्या ४०% नुसार ५ हजार १२ पदे शासन भरण्यासाठी प्रयत्नशिल आहे या प्रक्रयेला मान्यता मिळवण्यासाठी जर ३ वर्ष लागत असतील तर हा पात्रता धारकांवर व विद्यार्थ्यांवर केलेला मोठा अन्याय आहे. अधिवेशनात सहा. प्राध्यापक पदांना मंजूरी मिळाली आहे असे उत्तर देवून चालणार नाही तर या संदर्भात ठोस कृती झाली पाहीजे अन्यथा परत संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
प्रा. डॉ. संदीप पाथ्रीकर अध्यक्ष महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना
AICHE अंतर्गत ‘ही’ माहिती तातडीने भरा; Pune University ने सर्व महाविद्यालयांना दिले तातडीचे आदेश
भरती प्रक्रिया केवळ लांबणीवर






