बोर्ड परीक्षा केंद्रावर रेकॉर्डिंग अनिवार्य (फोटो- istockphoto)
राज्य आणि विभागीय मंडळाने उचलले कडक पाऊ
परीक्षा काळात भरारी पथके, बैठी पथके कार्यरत
‘लाईव्ह अॅक्सेस’ उपलब्ध करणे अनिवार्य
रत्नागिरी: फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होत असलेल्या इयत्ता दहावी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य आणि विभागीय मंडळाने कडक पावले उचलली आहेत. या पाश्र्वभूमीवर, विभागीय मंडळाने सर्व परीक्षा केंद्र शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि केंद्रसंचालकांसाठी (Exam) सीसीटीव्ही यंत्रणेच्या वापराबाबत व रेकॉर्डिंग जतन करण्याबाबत अत्यंत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या निर्देशांचे पालन न झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तीवर थेट कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ आणि माध्यमिक शालान्त (दहावी) परीक्षा २० मार्च ते १८ मार्च २०२६ या कालावधीत लेखी परीक्षा होत आहेत. या संपूर्ण लेखी परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राचा परिसर, परीक्षेशी संबंधित सर्व वर्गखोल्या, आयटी आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वापरल्या जाणाऱ्या संगणक प्रयोगशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…
आवश्यकतेनुसार बॅकअप घेणे बंधनकारक
केवळ कॅमेरे लावणे पुरेसे नसून, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहील. परीक्षा कालावधीत पेपर सुरू होण्यापूर्वी दररोज आणि वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत अथवा नाहीत, रेकॉर्डिंग होत आहे अथवा नाही यावाचत खात्री करण्यासाठी केंद्र संचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
तांत्रिक सुस्पष्टतेसाठी मंडळाने निर्देशित केले आहे की, सर्व कॅमेरे नेहमी सातत्यपूर्ण रेकॉर्डिंग मोडवरच असावेत आणि मोशन रेकॉर्डिंग पूर्णपणे टाळावे. रेकॉर्ड केलेले फुटेज पेन ड्राईव्ह संगणकावर किंवा आवश्यकतेनुसार हार्ड डिस्कमध्ये पुढील आदेशापर्यंत जतन करून (साठवून) ठेवावे. आवश्यकतेनुसार क्लाउड स्टोअरेज किंवा एक्सटर्नल हार्डडिस्कवर त्याचा बॅकअप घेणे बंधनकारक आहे.
SSC Exam: राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा! शासनाकडून परीक्षा पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न
सुरक्षेच्या दृष्टीने, जिल्हा दक्षता समिती, मंडळाने अथवा वरिष्ठ कार्यालयाने मागणी केल्यास परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्हीचे लाईव्ह अॅक्सेस’ उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. जर परीक्षा कालावधीत मेरे बंद आढळले, फुटेज उपलब्ध करून दिले नाही कंवा एक्सेस नाकारला, तर हा प्रकार गैरमार्ग अवलंबण्याच्या उद्देशाने केल्याचे मानले जाईल. अशा परिस्थितीत संबंधित केंद्राचे प्राचार्य, केंद्रसंचालक आणि कर्मचारी बदललेल्या केंद्रांच्या बाबतीत केंद्रसमन्वयक यांच्यावर कारवाई करण्यात येईल,






