(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
सदर घटना ही जपानमधील एका उद्यानात घडल्याचा दावा करण्यात आलेला आहे पण याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये कोणत्या तरी गोष्टावरुन वाद झाल्याचे दिसते ज्यानंतर बाॅयफ्रेंड रागाच्या भरात गर्लफ्रेंडला मारहाण करण्यास सुरुवात करतो. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की तो पार्कमध्ये फिरायला गेला होता तेव्हा त्याला हा वाद दिसला. तो दावा करतो की त्या तरुणाने यापूर्वीही त्याच्या प्रेयसीला अनेक वेळा मारहाण केली होती.
@gharkekalesh pic.twitter.com/aypsaRNOru — Arhant Shelby (@Arhantt_pvt) February 27, 2026
व्हिडिओमध्ये तो तरुण महिलेला वारंवार थप्पड मारताना दिसत आहे. घटनेचे रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की त्याने तिला २० ते ३० पेक्षा जास्त वेळा थप्पड मारली. व्हिडिओत गर्लफ्रेंड काही न बोलता गुपचूप बाॅयफ्रेंडचा मार खाताना दिसते. कारण काहीही असो हिंसा ही कधीही स्वीकार्य ठरत नाही याची जाण मुलींना खरंतर असायला हवी. यूजर्स व्हिडिओवर आता तीव्र संताप व्यक्त करत असून हा व्हिडिओ आपल्याला दाखवतो की नातेसंबंधात आदर आणि सुरक्षिततेची भावना किती महत्त्वाची आहे. व्हिडिओला @Arhantt_pvt नावाच्या एक्स अकाऊंवरुन शेअर करण्यात आले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






