इंग्लंडने TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
ENG vs WI, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियम खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वेस्ट इंडिज संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे.
या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली आहे. वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचा ३५ धावांनी पराभव केला होता. तर इंग्लंड संघाने नेपाळ संघाविरुद्ध ४ धावांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला होता. इंग्लंड संघाला मागील सामन्यात स्कॉटलंडने चांगलेच झुरवले होते. त्यामुळे त्यांना या सामन्यात आपली कामगिरी उंचवावी लागेल. तर वेस्ट इंडिजचा कर्णधार मागील सामन्यात अपयशी ठरला होता. संघाला त्याच्याकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी ब्रूकने टॉस जिंकून प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आम्ही गोलंदाजी करणार आहोत. आम्ही आकडेवारी पाहिली आहे आणि ते दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाला अनुकूल आहेत, म्हणून आम्हाला आज रात्री पाठलाग करायला आवडेल. ल्यूक वूडऐवजी जेमी ओव्हरटन संघात असणार आहे. फक्त थोडी अतिरिक्त फलंदाजीची खोली. लूकसाठी कोणतीही समस्या किंवा त्रास नाही – आम्ही आज रात्री त्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
टॉस गमवणाऱ्या वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप म्हणाला की, “आम्हीही आधी गोलंदाजी केली असती, पण आता बॅटने सूर निश्चित करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की ते काय करण्यास सक्षम आहेत आणि ते तुम्हालाही ओळखतात. आमच्याकडे एक बदल करण्यात आला आहे. फोर्ड चुकतो आणि रोस्टन चेस खेळणार आहेत.”
हेही वाचा : T20 World Cup 2026 : श्रीलंकेला मोठा झटका! टी२० विश्वचषकातून वानिंदू हसरंगा बाहेर, ‘या’ खेळाडूची लागली वर्णी
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकिल होसेन, गुडाकेश मोती, शमार जोसेफ
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: फिलिप साल्ट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद






