NEET PG रिझल्ट कधी लागणार, कुठे पाहता येणार (फोटो सौजन्य - iStock)
NEET PG परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, NEET PG निकाल २०२५ या आठवड्यात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) कडून त्याच्या नियोजित वेळेपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निकाल आज जाहीर केला जाणार नाही, तर निकाल उद्या किंवा २१ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मात्र अजून तारीख घोषित करण्यात आलेली नाही. अजूनही याचा अंदाज लावण्यात येत आहे.
NBEMS च्या natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटद्वारे निकाल ऑनलाइन जाहीर केला जाईल. निकाल PDF स्वरूपात जाहीर केला जाईल ज्यामध्ये अर्ज आयडी, रोल नंबर, पर्सेंटाइल आणि रँक नोंदवले जातील.
Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा
निकालानंतर स्कोअरकार्ड जारी केले जाईल
निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी NBEMS कडून स्कोअरकार्ड जारी केले जाईल. स्कोअरकार्ड जाहीर झाल्यानंतर, उमेदवार लॉगिन तपशील प्रविष्ट करून ते डाउनलोड करू शकतील.
२.४२ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. तर यावेळी २.४२ लाख उमेदवारांनी NEET PG परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ही परीक्षा ३ ऑगस्ट रोजी देशभरातील ३०१ शहरांमधील १०५२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
निकाल कसा तपासायचा
या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश उपलब्ध असेल
NEET PG परीक्षेद्वारे, उमेदवारांना MD/MS/PG डिप्लोमा अभ्यासक्रम, पोस्ट MBBS DNB अभ्यासक्रम, थेट ६ वर्षांचे DRNB अभ्यासक्रम आणि NBEMS डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळू शकेल. ऑल इंडिया कोटाच्या ५० टक्के जागा, डीम्ड आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीजच्या १०० टक्के जागा आणि ऑल इंडिया ओपन DNB च्या १०० टक्के जागांवर प्रवेश दिला जाईल.
प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रिया १० ते २० सप्टेंबर दरम्यान सुरू होण्याची अपेक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर केले जाईल. यानंतर, उमेदवार त्यांच्या श्रेणीनुसार समुपदेशनात सहभागी होऊन प्रवेश घेऊ शकतील आणि त्यानुसार पुढची दिशा ठरवता येईल.