सिल्लोडमध्ये कत्तलखान्यावर छापा; दीड लाखांचे गोमांस जप्त (Photo Credit- X)
अन्सार सलीम कुरेशी, इलियास सलीम कुरेशी, गालिब अन्सार कुरेशी, लादेन अन्सारी कुरेशी अशी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी नावे आहेत. तर इलियास सलीम कुरेशी, गालिब अन्सार कुरेशी, लादेन अन्सारी कुरेशी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीवरुन गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, पोलिस कर्मचारी विठ्ठल डोके, गोपाल पाटील, राहुल गायकवाड, संदीप कोळगे, ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, लहू घोडे, पोलिस कर्मचारी कडुबा भाग्यवंत, सचिन काळे, अनंत जोशी संजय आगे, राजू काकडे, सतीश पाटील यांनी डोंगरगाव येथे छापा मारला असता आरोपी इलियास कुरेशीच्या घरातील किचन रुमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस मिळून आला. पोलिसांनी गोमांस, सुरे, चरबी असा १ लाख ५५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत तिघांना ताब्यात घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक लहू घोडे करीत आहे. तर जप्त केलेला गोमांसाच पोलिसांनी खड्डा खोदून नष्ट केला.
Crime News: अपघातानंतर दुचाकीस्वाराने पर्यटकाला केली मारहाण; गुन्हा दाखल
डोंगरगावात कत्तलखान्यावर पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वीही ग्रामीण पोलिसांनी पहाटे छापा मारुन गोमांस पकडला होता. यावेळी मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. आता पुन्हा छापा मारुन ग्रामीण, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दीड लाखांचा गोमांस पकडण्यात आला. छापा मारलेल्या घरात हाडामांसासह रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला होता. रविवारी आरोपींना न्यायालयासमोर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
Chhatrapati sambhajinagar: ‘मुलगी नको’ म्हणत धमकी आणि तिहेरी तलाक; पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल






