फोटो सौजन्य - Social Media
नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च (NITTTR), चंदीगड यांनी विविध विभागांमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात अध्यापन करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम करिअर संधी आहे. हे संस्थान शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत Distinct Category अंतर्गत डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता प्राप्त आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात 9 सप्टेंबर २०२५ पासून करण्यात आली होती. ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर २०२५ रोजी संपणार आहे. तसेच या भरती संदर्भात हार्ड कॉपी पोहोचण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2025 ठेवण्यात आली आहे.
अर्ज करताना उमेदवारांना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य / OBC / EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ₹1000/- रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. SC / ST / PwBD / महिला उमेदवार ₹1000/- (परीक्षा/इंटरव्ह्यूला उपस्थित झाल्यानंतर बँक चार्जेस वजा करून परतावा) रुपये अर्ज शुल्क म्हणून भरणार आहेत. तर आंतरर्गत उमेदवारी (NITTTR) असणाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम आकारण्यात येणार नाही.
असिस्टंट प्रोफेसर पदासाठी फक्त ४ जागा रिक्त आहेत. ज्या उमेदवारांची B.E./B.Tech./B.S. आणि M.E./MTech./M.S. किंवा इंटिग्रेटेड M.Tech. संबंधित शाखेत (फर्स्ट क्लास किंवा समकक्ष गुण) (AICTE च्या नियमांनुसार) या क्षेत्रात शिक्षण झाले आहे, त्यांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादे संबंधित असणाऱ्या अटींनुसार, कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. मात्र प्राध्यापकांचे निवृत्ती वय 65 वर्षे आहे. आरक्षण प्रवर्गानुसार वयातील शिथिलता भारत सरकारच्या नियमानुसार लागू होईल.
निवड प्रक्रिया
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी www.nitttrchd.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर 9 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी काढून स्वप्रमाणित कागदपत्रांसह खालील पत्त्यावर 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत स्पीड पोस्टद्वारे पाठवणे आवश्यक आहे –
Dean (Administration & Finance), NITTTR, सेक्टर-26, चंदीगड – 160019
लिफाफ्यावर “Application for the post of Assistant Professor (Department Name)” असे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे.