फोटो सौजन्य - Social Media
ही भरती तंत्रज्ञान आणि जोखमीशी संबंधित विविध पदांसाठी केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीची अर्ज प्रक्रिया २८ फेब्रुवारी पासून सुरू झाली असून २३ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहील. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
१. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत पोर्टवर जा आणि तुमची नवीन नाव नोंदणी करा. आवश्यक असलेली सर्व माहिती भरुन नोंदणी पूर्ण कराल.
२. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल, जो MSS आणि ईमेलद्वारे पाठवला जाईल.
३. त्याचा वापर करुन लॉगीन करा आणि संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरा.
४. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्र इ.) अपलोड करा.
५. अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
६. भरलेला अर्ज सेव्ह करा आणि पुढे नेक्स्ट पर्याय वापरून फॉर्म तपशील पुन्हा तपासा.
७. अंतिम सबमिशननंतर, पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.
८. बँकेने स्पष्ट केलेय की एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत. म्हणून, कृपया तो सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
२७५ पदांना तंत्रज्ञानसंबंधित जोखीम क्षेत्रांशी निगडीत विभागण्यात आले आहेत. जसं जावा आणि .NET सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, डेटाबेस प्रशासन, डिजिटल चॅनेल व्यवस्थापन, माहिती सुरक्षा आणि सायबर सुरक्षा, नेटवर्क आणि क्लाउड व्यवस्थापन, विंडोज आणि अॅक्टिव्ह डायरेक्टरी प्रशासन, डेटा अभियांत्रिकी आणि डेटा विज्ञान, DevSecOps, जोखीम व्यवस्थापन, आयटी अधिकारी किंवा जनरल एआय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहे.
बहुतेक पदांसाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात BE/BTech किंवा MCA पदवी असणं आवश्यक आहे. विविध पदांसाठी २ ते १० वर्षांचा कामाचा अनुभवदेखील आवश्यक आहे. काही पदांसाठी, ओरेकल, रेड हॅट, व्हीएमवेअर, मायक्रोसॉफ्ट, स्प्रिंग फ्रेमवर्क आणि सायबरसुरक्षा या क्षेत्रातील प्रमाणपत्रे आवश्यक असू शकतात.






