रक्तातील कावीळ कशामुळे होते? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी होईल मृत्यू
कावीळ होण्याची कारणे?
रक्तातील कावीळ कशामुळे होते?
कावीळ झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
वातवरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, दूषित पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराला कावीळसारख्या गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याचं बिघडून जाते. कावीळ हा लिव्हरसबंधित अतिशय धोकादायक आजार आहे. योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील रक्ताचे पाणी होते आणि कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. शरीरातील बिलीरुबिन नावाच्या पिवळ्या रंगाच्या द्रव पदार्थाचे प्रमाण वाढल्यानंतर कावीळ होते.जगभरात लिव्हरच्या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात कावीळ कशामुळे होते? कावीळ झाल्यानंतर कोणते लक्षणे दिसून येतात आणि त्यावरील उपाय? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
दूषित पाणी किंवा खराब अन्नपदार्थांच्या सेवनामुळे कावीळ होण्याची शक्यता असते. ‘हेपेटायटीस ए’ आणि ‘हेपेटायटीस ई’ मुळे भारतात कावीळीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. रक्तातील जुन्या लाल पेशी फुटल्यानंतर त्यातून बिलीरुबिन तयार होते लिव्हरद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते. पण ज्यावेळी लिव्हर हे काम करण्यास असमर्थ ठरते, तेव्हा लिव्हरमध्ये पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ साचून राहण्यास सुरुवात होते. कावीळ झाल्यानंतर शरीराचा रंगच नाहीतर पचनसंस्था आणि मानसिक आरोग्य बिघडून टाकते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर कोणतेही चुकीचे घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. कावीळ झाल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास ती संपूर्ण शरीरात पसरून रक्तात मिक्स होते, ज्याच्या परिणामामुळे मृत्यू होतो.
रक्तातील किंवा कोणत्याही प्रकारातील कावीळ झाल्यानंतर बाहेरील तेलकट आणि दूषित अन्नपदार्थांचे अजिबात सेवन करू नये. आहारातून तेलकट, मसालेदार किंवा तिखट पदार्थ पूर्णपणे बदन करून टाकावेत. आहारात उसाचा रस, ग्लुकोज पाणी, मुळा, पपई आणि शहाळ्याचे पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ सहज पचन होतात. याशिवाय जेवणामध्ये सहज पचन होणाऱ्या डाळींचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि आतडे स्वच्छ राहतात.
Ans: जेव्हा शरीरातील लाल रक्तपेशींच्या विघटनामुळे तयार होणारा 'बिलीरुबिन' (Bilirubin) नावाचा पदार्थ यकृत नीट प्रक्रियेत आणू शकत नाहीतेव्हा तो रक्तात साचतो.
Ans: त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडणे, लघवीचा रंग गडद पिवळा किंवा नारिंगी होणे.
Ans: भरपूर द्रव पदार्थ: पाणीलिंबू पाणीनारळ पाणी, ताक, फळांचा रस.






