अजितदादांचा विमान अपघात की घातपात? एक महिना झाला तरीही काय सांगतो तपास?
अजित पवारांव्यतिरिक्त, विमानात इतर चार जण होते, ज्यात दोन क्रू मेंबर्स आणि अजित पवार यांचे दोन सहकारी होते. DGCA च्या मते, या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) मोठी कारवाई सुरू केली आहे. बारामती विमान अपघाताच्या चौकशीदरम्यान डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्सच्या चार विमानांचे उड्डाण थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते. बारामती अपघातानंतर केलेल्या विशेष ऑडिट आणि देखरेखीदरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आली.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) VSR व्हेंचर्सच्या ताफ्यातील चार विमाने ग्राउंडेड केली आहेत. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर, विशेष सुरक्षा लेखापरीक्षणात अनेक नियम आणि देखभाल प्रक्रियांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले. या आधारे, VSR व्हेंचर्सची चार Learjet 40/45 विमाने ग्राउंडेड करण्यात आली आहेत आणि दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व मानके पूर्ण झाल्यानंतर त्यांना उड्डाण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाईल.
२८ जानेवारी रोजी झालेल्या लिअरजेट ४५ विमानाच्या (व्हीटी-एसएसके) अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले. विमान वाहतूक नियामकाने एका निवेदनात म्हटले आहे की, ऑडिट टीमला विमानाच्या हवाई योग्यता, हवाई सुरक्षा आणि उड्डाण ऑपरेशन्सच्या क्षेत्रात कंपनीमध्ये मान्यताप्राप्त प्रक्रियांचे अनेक गैर-अनुपालन आढळले.
विधानानुसार, “देखभाल प्रक्रियेतील अनियमितता आणि कमतरता लक्षात घेता, नोंदणी क्रमांक व्हीटी-व्हीआरए, व्हीटी-व्हीआरएस, व्हीटी-व्हीआरव्ही आणि व्हीटी-टीआरआय असलेल्या लिअरजेट ४०/४५ विमानांना तात्काळ ग्राउंड करण्याचा आणि मानके पुनर्संचयित होईपर्यंत सुधारणात्मक उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
शिवाय, डीजीसीएने म्हटले आहे की संबंधित क्षेत्रातील कमतरता नोंदवण्यासाठी व्हीएसआर व्हेंचर्सना फॉर्म जारी करण्यात आले आहेत जेणेकरून ते उल्लंघनांचे मूळ कारण विश्लेषण सादर करू शकतील. पुढील कारवाई करण्यापूर्वी डीजीसीए या अहवालांचे मूल्यांकन करेल.
जानेवारीच्या अखेरीस बारामतीजवळ झालेल्या लिअरजेट ४५ विमान अपघातात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले, त्यानंतर विमान वाहतूक नियामकाने या प्रकरणाची विशेष चौकशी सुरू केली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुष्टी केली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा जीव घेणाऱ्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केला जाईल,अशी माहिती मिळत आहे.
– अजित दादांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला.
– 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाला अपघात झाला होता.
– बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीजवळच सकाळी 8:44 वाजता हा अपघात झाला.
– या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते.
– अजित पवार यांच्यासह पाच जणांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला, ते विमान लियरजेट-45 XR प्रकारचं विमान होतं.
-अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे.
– विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ‘ब्लॅक बॉक्स’ हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
– ‘ब्लॅक बॉक्स’वर या अपघाताचे गूढ उकलण्याची भिस्त आहे, तो पूर्णतः सुरक्षित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे
– गेल्या दोन दिवसांपासून रोहित पवार हे DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही आणि आक्रमक दिसले.






