Maharashtra Breaking News Updates Today:
28 Feb 2026 09:45 AM (IST)
बऱ्याच कायदेशीर लढाई आणि वादानंतर, “द केरळ स्टोरी” प्रदर्शित झाला आहे. जरी तो २७ फेब्रुवारी रोजी सकाळी थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायला हवा होता, परंतु कायदेशीर अडचणींमुळे सकाळी प्रदर्शित झाला नाही. दुपारी स्थगिती उठवण्यात आली, ज्यामुळे चित्रपट रात्रीपर्यंत थिएटरमध्ये पोहोचू शकला. काही ठिकाणी संध्याकाळी ७ वाजता आणि काही ठिकाणी रात्री ८ वाजता शो सुरू झाले. पहिल्या दिवशी कमी तिकीट विक्रीमुळे निर्मात्यांना तोटा सहन करावा लागू शकतो, कारण चित्रपटाच्या प्रदर्शनाची बातमी वेळेवर सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही. “द केरळ स्टोरी २” हा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या “द केरळ स्टोरी” चा सिक्वेल आहे. कमी बजेट असूनही, मागील चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. आता, सर्वांच्या नजरा दुसऱ्या भागावर आहेत.
28 Feb 2026 09:25 AM (IST)
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. राहत्या घरात पती पत्नीचे संशयास्पद मृतदेह आढळून आले आहे. दोघांच्या तोंडातून फेस आल्याने ही घटना आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय निर्माण झाला आहे. सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृतकाचे नाव आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलावती नगर येथे घडली.
28 Feb 2026 09:15 AM (IST)
अजित पवारांव्यतिरिक्त, विमानात इतर चार जण होते, ज्यात दोन क्रू मेंबर्स आणि अजित पवार यांचे दोन सहकारी होते. DGCA च्या मते, या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) मोठी कारवाई सुरू केली आहे. बारामती विमान अपघाताच्या चौकशीदरम्यान डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्सच्या चार विमानांचे उड्डाण थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते. बारामती अपघातानंतर केलेल्या विशेष ऑडिट आणि देखरेखीदरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आली.
28 Feb 2026 09:05 AM (IST)
Pakistan cricket fans begged for victory from Sri Lanka : २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील गट २ चे समीकरण मनोरंजक बनले आहे. इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध चार विकेट्सने मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तानच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. या गटातील अंतिम सुपर ८ सामना २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.
28 Feb 2026 08:50 AM (IST)
28 फेब्रुवारी रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 16,158 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,811 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,119 रुपये आहे. भारतात 28 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,110 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,61,580 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,21,190 रुपये आहे. भारतात 28 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 284.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,84,900 रुपये आहे.
28 Feb 2026 08:35 AM (IST)
सांगली : राज्यातील मतदार यादी शुद्धीकरण (एसआयआर) प्रक्रियेनंतर सुमारे 50 लाख मतदारांची नावे कमी होणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. जिल्ह्यातील ऊरुण ईश्वरपूर नगरपालिका व आटपाडी नगरपंचायतीला भेट दिल्यानंतर सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
28 Feb 2026 08:21 AM (IST)
दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हिया देशात विमान कोसळून भीषण अपघात झाला. या झालेल्या विमान अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. चलनी नोटांनी भरलेले बोलिव्हियन हवाई दलाचे विमान टेकऑफनंतर महामार्गावर कोसळले. विमानाने अनेक वाहनांनाही धडक दिल्याची माहिती दिली जात आहे.
भारतात आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती गेल्या 3 ते 4 दिवसांपासून स्थिर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता चांदीचे दर स्थिरावले आहेत. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,110 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,61,580 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,21,190 रुपये आहे.






