फोटो सौजन्य - Social Media
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसमध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. ट्रान्सलेटरच्या रिक्त पदांसाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. मुळात, या भरतीमध्ये १५ रिक्त जागा आहेत. हिंदी ट्रान्सलेटरच्या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण भारतभरात या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. स्त्री तसेच पुरुष दोंघांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. नोव्हेंबरच्या १३ तारखेला या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, डिसेंबरच्या १० तारखेपासून भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारांनी आज पासून अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारीच्या ८ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच नियुक्तीच्या प्रक्रियेत उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. अद्याप, या परीक्षेची तारिकॅह जाहीर करण्यात आली नाही आहे.
अर्ज करताना उमेदवारांना काही बाबी लक्षात घयावा लागणार आहेत. एकंदरीत, अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून २०० रुपये भरावे लागणार आहेत. तर EWS आणि OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही अर्ज शुल्क म्हणून २०० रुपये भरायचे आहे. उमेदवारांना अर्जाची रक्कम ऑनलाईन स्वरूपात करायची आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्काची रक्कम मोफत आहे. एकंदरीत, SC आणि ST मधून येणाऱ्या उमेदवारांना अगदी निशुल्क अर्ज करता येणार आहे. महिला उमेदवारांकडूनही कोणतीही रक्कम आकारण्यात येणार नाही. तसेच ESM प्रवर्गातील उमेदवारांनादेखील निशुल्क अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. त्या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभाग घेता येणार आहे. तर अर्ज करण्यास पात्र उमेदवारणाची कमाल आयु मर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये उमेदवाराच्या संदर्भात काही शैक्षणिक अटी आहेत. एकंदरीत, अर्ज करता उमेदवार पदवीधर असावा. इंग्रजी आणि हिंदी विषयात अभ्यास असावा. या भाषा विषयांमध्ये परिपाक उमेदवारालाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये ५ टप्प्यातच समावेश आहे. Physical Standards Test (PST)च्या आधारावर उमेदवारांच्या नियुक्तीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. तसेच उमेदवारांची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये दस्तऐवजांच्या पडताळणीचा समावेश आहे. तसेच वैद्यकीय चाचणीसह उमेदवारांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेचा समारोप होईल.