सौजन्य-Staff selection Commision
एसएससी एमटीएस (SSC MTS )परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग एसएससी एमटीएस निकाल लवकरच जाहीर करणार आहे. या SSC MTS भरती परीक्षेच्या निकालासंबंधी नवीन अपडेट SSC ची अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर परीक्षार्थी पाहू शकतात. कर्मचारी निवड आयोग (SSC) MTS आणि हवालदार भरती परीक्षा 2024 च्या उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली होती.आता उमेदवारांकडून अधिकृत निकाल वाट पाहिली जात आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) 30 सप्टेंबर 2024 ते 14 नोव्हेंबर 2024 या दरम्यान एमटीएस टियर-1 साठी लेखी भरती परीक्षा घेतली होती. या SSC MTS आणि हवालदार सरकारी नोकरी परीक्षेद्वारे एकूण 9583 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी मल्टी टास्किंग स्टाफ पदाकरिता 6144 जागा रिक्त आहेत तर 3449 जागा हवालदार पदाकरिता आहेत.
SSC मल्टी टास्किंग स्किंग स्टाफ, हवालदार भरती 2024 लेखी परीक्षेचा निकाल लवकरच अधिकृत वेबसाइट ssc.gov.in (SSC MTS हवालदार सरकारी निकाल) वर घोषित केला जाणार आहे. ज्या उमेदवारांनी एसएससी एमटीएस ही परीक्षा दिली आहे ते रोल नंबर आणि पासवर्डद्वारे अधिकृत निकाल तपासू शकणार आहेत.
एसएससी मल्टी टास्किंग परीक्षा उतीर्ण झाल्यास खालील विभागांमध्ये मिळते नोकरी
केंद्रीय सचिवालय
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT)
सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग
दूरसंचार विभाग
नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
कामगार ब्युरो
परराष्ट्र मंत्रालय
गृह मंत्रालय इ.
SSC MTS हवालदार निकाल कधी जाहिर केला जाणार?
SSC MTS आणि हवालदार भरती परीक्षा 2024 ही 30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान विविध शिफ्टमध्ये घेण्यात आली. या संगणकीय परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले. एसएससी एमटीएस आणि हवालदार परीक्षा 2024 ची उत्तर पत्रिका (Answer Key) ही 29 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली. रिपोर्ट्सनुसार, एसएससी एमटीएस आणि हवालदार भरतीचा निकाल हा डिसेंबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यात अथवा जानेवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो.
एसएससीचा निकाल तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
एसएससी एमटीएस निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार खाली दिलेल्या स्टेपचे अनुसरण करून त्यांचा निकाल तपासू शकतात-
स्टेप 1 – एसएससी एमटीएस निकाल पाहण्यासाठी, कर्मचारी निवड आयोगाच्या ssc.gov.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्या,
स्टेप 2 – यानंतर SSC वेबसाइटच्या होमपेजवर दिसणाऱ्या निकाल विभागात जा.
स्टेप 3- निकाल जाहीर झाल्यावर SSC MTS हवालदार निकाल 2024 PDF च्या लिंकवर क्लिक करा .
स्टेप 4- तुमचा रोल नंबर आणि नाव शोधा.
स्टेप 5 – SSC परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल. एसएससी निकालाची PDF फाईल तुमच्या सिस्टिममध्ये सेव्ह करा.