फोटो सौजन्य - Social Media
इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. या भरतीच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केला होता. विशेष म्हणजे या भरती संदर्भात दोन लिस्ट जाहीर करण्यात आले आहेत. या दोन्ही मेरिट लिस्टमध्ये अनेक उमेदवारांची नावे आले आहेत. परंतु, अद्याप काही अर्ज कर्त्या उमेदवारांची नावे येणे बाकी आहेत. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे कि तिसरी लिस्ट जाहीर करण्यात आली असून, उमेदवारांना जाहीर करण्यात आलेली तिसरी लिस्ट पाहता येणार आहे. पहिली लिस्ट १७ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. याच्या एका महिन्यानंतर १७ सप्टेंबरला या भरतीची दुसरी लिस्ट जाहीर करण्यात आली. तर तिसरी लिस्ट १९ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : NHAI मध्ये मॅनेजरच्या पदासाठी भरतीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यांतकर्ता येईल अर्ज
ग्राम डाक सेवकाच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. भारतीय पोस्टमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते. मुळात, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे घेतली जाणार होते. एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना SSC उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. एकूण ४४,४२८ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. १५ जुलै २०२४ रोजी या भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली होती. इच्छुक उमेदवारांना ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार होते.
अशा प्रकारे पाहता येईल तिसरी मेरिट लिस्ट :
हे देखील वाचा : नेव्हल रॅपर शिप यार्डमध्ये भरतीची संधी; २१० रिक्त जागांसाठी करता येणार अर्ज
तसेच पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेले अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वगाचुं घ्यावी, त्यानुसार पुढील हालचाल करावी.