फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली विद्यापीठामध्ये भरतीला सुरुवात करण्यात येणार आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुळात, ही भरती नॉन टिचिंग पोस्टसाठी आहे. असिस्टंट रजिस्टर, सिनिअर असिस्टंट तसेच असिस्टंटच्या रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजली गेली आहे. १८ डिसेंबर २०२४ पासून ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आज या भरतीच्या संदर्भांत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
जर तुम्ही दिल्ली विद्यापीठामध्ये किंवा इतरच राज्यात जाऊन काम करण्यासाठी संधी शोधत आहात तर ही सर्वोत्तम संधी आहे. एकूण १३७ रिक्त पदांसाठी ही भरती आयोजली गेली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्वाच्या भरतीपैकी ही भरती असून, या भरतीची मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा केली जात होती. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. नोकरीचे ठिकाण दिल्ली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी du.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. एकंदरीत, अर्ज करते वेळी उमेदवारांना अर्ज शुल्काची काही रक्कम भरावी लागणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. OBC तसेच EWS या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. महिला उमेदवारांनाही ८०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. PwBD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही अर्ज शुल्क म्हणून ६०० रुपयांची भरपाई करायची आहे.
पदांनुसार पात्रता आणि योग्यता जाणून घ्या:
असिस्टंट रजिस्टर :
असिस्टंट रजिस्टरच्या पदासाठी अर्ज करता उमेदवार किमान ५५%ने पदव्युत्तर हवा. तर यहा पदासाठी जास्तीत जास्त ४० वर्षे आयु असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
सिनिअर रजिस्टर :
सिनिअर रजिस्टरच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार कॉम्प्युटर अप्लिकेशन, नॉटिंग आणि ड्राफ्टिंगसारख्या विषयामध्ये प्रोफिशिअन्सी असणे गरजेचे असते. तसेच उमेदवाराकडे मान्यता प्राप्त संस्थेतून बॅचलर डिग्री असणे गरजेचे आहे.
असिस्टंट :
असिस्टंटच्या पदासाठी ३२ वर्षांपर्यंत आयु असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. दोन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तर उमेदवाराला कॉम्प्युटर ऑपरेशनमध्ये कौशल्य ज्ञात हवे.