फोटो सौजन्य - Social Media
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)ने भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. विविध १७ विभागांमध्ये ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. IIT मध्ये करिअर करू पाहणाऱ्या तसेच या क्षेत्रात काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांना या भरतीचा लाभ घेता येणार आहे. या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसुचना जाहिर करण्यात आली आहे. मुळात, ही रोलिंग अधिसूचना आहे. या जाहिरातीची विशेष बाब म्हणजे या जाहिरातीमध्ये शेवटची तारीख नमूद नसते. ही अधिसूचना संपूर्ण वर्षभरापर्यंत मर्यादित असते. इच्छुक उमेदवार या वर्षभरात कधीही या भरतीसाठी अर्ज करू शकतो. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IIT च्या iitism.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे.
IIT ISM च्या या भरतीमध्ये उपयोजित भूगर्भशास्त्र, रासायनिक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, खाणकाम अशा विविध विभागांमध्ये भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण १७ विविध विभागांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. नियुक्तीसाठी उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. या भरतीसाठी भारतीयांना अर्ज करता तर येणारच आहे, त्याचबरोबर भारतीय मूळ वंशाचे असणारे ( PIO ), भारताचे विदेश नागरिक (OCI ) तसेच विदेशी नागरिक ज्यांच्याकडे PIO किंवा OCI कार्ड नाही आहे, त्यांनादेखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहेत. हे पात्रता निकष शैक्षणिक आहेत. तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना संबंधित विषयात PhD असणे आवश्यक आहे. जर तुम्ही असोसिएट प्रोफेसर तसेच प्रोफेसरच्या पदासाठी अर्ज करत आहात तर तुमच्याकडे अनुभव असणे फार महत्वाचे आहे. अधिसूचनेमध्ये वयोमर्यादे संदर्भात अटी शर्तीही नमूद करण्यात आले आहेत. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यास ३५ वर्षे आयुहुन कमी वय असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.
किती असणार वेतन?
असिस्टेंट प्रोफेसर ग्रेड II पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला वेतन 70,900/- पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. असिस्टेंट प्रोफेसर ग्रेड I या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमाह वेतन 1,01,500/- निश्चित करण्यात आली आहे. एसोसिएट प्रोफेसर पदासाठी 1,39,600/- वेतन आणि प्रोफेसर पदासाठी 1,59,100/- वेतन निश्चित करण्यात आले आहे.