फोटो सौजन्य- सोशल मीडिया
जिओमध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार असते. १२ वी पास उमेदवारांसाठी सेल्स आणि ग्राहक सेवेशी संबंधित पदे उपलब्ध असातात. तसेच पदवीधर उमेदवारांसाठी सेल्स, बिझनेस, ऑपरेशन, ग्राहक सेवा आणि इतर विभागांमध्ये त्यांच्या पात्रतेनुसार अर्ज करण्याची संधी आहे. इंजिनिअरिंग आणि आयटीची पदवी असलेल्या उमेदवारांसाठी तांत्रिक पदे याशिवाय एचआर, फायनान्स, मार्केटिंग आणि मॅनेजमेंटशी संबंधित संधी देखील आहेत.
जिओमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. यासाठी सर्वात आधी कंपनीच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जावे. येथे जॉब सर्चच्या पर्यायामध्ये आपली पात्रता, आवडीचा विभाग आणि शहरानुसार उपलब्ध पदे शोधावित. ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्याची माहिती आणि पात्रतेच्या अटी कळजीपूर्वक जाणून घ्याव्यात . त्यानंतर उमेदवाराने प्रोफाईल बनवून त्यामध्ये अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरावी. त्यानंतर आपला रेझ्युमे अपलोड करावा . अर्ज जमा करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्यावी.
जिओमधील निवड प्रक्रिया पदानुसार वेगवेगळी असते. कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार, ज्यामध्ये अर्जाची छाननी, ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखतीचा समावेश आहे. ऑनलाइन टेस्टमध्ये सामान्य गणित, तार्किक क्षमता आणि भाषेशी संबंधित प्रश्न विचारलेले जातात, तांत्रिक पदांसाठी संबंधित विषयाची परीक्षा घेतली जाते. मुलाखतीत उमेदवाराचे ज्ञान, अनुभव, काम करण्याची पद्धत आणि समस्या सोडवण्याची क्षमता तपासली जाते. निवड झाल्यानंतर कंपनीकडून अधिकृत ऑफर लेटर दिले जाते.
Ans: १२ वी पास उमेदवारांसाठी जिओमध्ये प्रामुख्याने सेल्स (Sales) आणि ग्राहक सेवा (Customer Care) शी संबंधित पदे उपलब्ध असतात.
Ans: जिओच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जाऊन उमेदवाराला प्रोफाईल तयार करावी लागते आणि आवडीच्या पदानुसार ऑनलाइन रेझ्युमे अपलोड करून अर्ज सादर करावा लागतो.
Ans: निवड प्रक्रियेमध्ये अर्जांची छाननी, ऑनलाईन टेस्ट (सामान्य गणित, तार्किक क्षमता, भाषा किंवा तांत्रिक विषय) आणि मुलाखत यांचा समावेश असतो.






