फोटो सौजन्य - Social Media
राईट्स लिमिटेड (RITES) तर्फे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 600 पदांवर नियुक्ती केली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत RITES च्या अधिकृत संकेतस्थळावर [rites.com](https://rites.com) माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता म्हणून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, एस अँड टी, मेकॅनिकल, केमिकल या शाखांमध्ये पूर्णवेळ डिप्लोमा असणे आवश्यक आहे. रसायनशास्त्र विषयासाठी पूर्णवेळ बी.एससी. पदवी आवश्यक आहे. संबंधित विषयात उच्च पात्रता (डिग्री किंवा पदव्युत्तर पदवी) असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
तसेच उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण, इंटर्नशिप, अध्यापन किंवा संशोधन फेलोशिपचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. एका ठराविक गुनशाखेत बसणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ही गुनशाखा आरक्षित वर्गानुसार विभागली गेली आहे. पाहिले तर सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी (NCL) उमेदवारांसाठी किमान 50% गुण आवश्यक आहे. SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी किमान 45% गुण आवश्यक आहे.
या पदासाठी उमेदवाराचे वय कमाल 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. सरकारच्या नियमानुसार ओबीसी, एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक आणि जम्मू-काश्मीर रहिवासी उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत मिळेल.
विशेषतः PwD उमेदवारांना 10 वर्षांची अतिरिक्त सूट देण्यात येईल.
उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत. सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी शुल्क ₹300 + लागू कर आयोजित करण्यात आले आहे तर ईडब्ल्यूएस, एससी, एसटी आणि PwD उमेदवारांसाठी शुल्क ₹100 + लागू कर निश्चित करण्यात आले आहे. विशेष नोंद: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना, जर त्यांनी पुढील टप्प्यातील परीक्षा (जसे की लेखी परीक्षा) दिली, तर त्यांचे शुल्क परत केले जाईल.
इच्छुक उमेदवारांनी पात्रतेच्या सर्व अटी काळजीपूर्वक वाचून नियोजित अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा. भरतीशी संबंधित सर्व ताज्या माहितीसाठी RITES च्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचा सल्ला देण्यात येतो.