फोटो सौजन्य - Social Media
LIC ने काही दिवसांअगोदर AAO पदांसाठी भरतीचे आयोजन केले होते. या भरतीमध्ये पात्रता अर्ज पात्र करून मोठ्या संख्यने उमेदवारांनी अर्ज केले होते. एलआयसी (LIC) तर्फे प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता (AE) भरतीसाठीची प्राथमिक परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 3 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना आता निकालाची आतुरतेने प्रतीक्षा आहे. हा निकाल लवकरच एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर [licindia.in](https://licindia.in) येथे जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांना निकालाची कोणतीही माहिती वैयक्तिक स्वरूपात पाठवली जाणार नाही, त्यामुळे सर्वांनी संकेतस्थळावर जाऊन निकाल तपासावा.
निकाल प्रसिद्ध होताच या भरतीसाठी वर्गनिहाय (category-wise) कटऑफ गुण देखील जाहीर केले जातील. जे उमेदवार निश्चित केलेल्या कटऑफ इतके किंवा त्याहून अधिक गुण मिळवतील, त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी पात्र मानले जाईल. एलआयसी एएओ/एई मुख्य परीक्षा 8 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र (admit card) परीक्षा तारखेच्या काही दिवस आधी डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिले जाईल.
स्कोअरकार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया
मुख्य परीक्षेचा नमुना (Exam Pattern)
प्रीलिम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेत बसण्याची संधी मिळेल. मुख्य परीक्षा दोन भागांत होईल: बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (Objective Test) 150 गुणांसाठी घेण्यात येईल तर वर्णनात्मक परीक्षा (Descriptive Test) 150 गुणांसाठी घेण्यात येईल. दोन्ही परीक्षा एका सत्रातच घेतल्या जातील आणि एकूण वेळ 3 तास 30 मिनिटे असेल. या भरतीद्वारे एकूण 841 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. उमेदवारांनी या भरतीशी संबंधित अद्ययावत माहिती व पुढील सूचनांसाठी एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी.