फोटो सौजन्य - Social Media
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)ने कंबाइन ग्रॅज्युएट लेव्हल एक्जामिनेशन (Combined Graduate Level Examination)चा निकाल जाहीर केला आहे. टियर-१ चा हा परिणाम जाहीर करण्यात आला आहे. निकाल सूची १, सूची २ तसेच सूची ३ अशा ३ सूचींमध्ये जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. तसेच त्यांना हा निकाल डाउनलोड करता येणार आहे. हा निकाल ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
या संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. जूनियर सांख्यिकी अधिकारी (JSO) (सूची-1), सांख्यिकीय अन्वेषक ग्रेड- II (SI) (सूची-2) आणि इतर पदांसाठी (सूची-3) या वेगवेगळी कट ऑफ निश्चित करण्यात आली आहे. अधिकृत अधिसूचनेमध्ये असे नमूद आहे कि,” टियर- I या परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या अंकानुसार उमेदवारांना टियर- II परीक्षेसाठी उपस्थित राहता येणार आहे.”
‘या’ उमेदवारांना टियर २ परीक्षेसाठी उपस्थित राहता येणार आहे
SSC CGL टियर १ परीक्षेत एकूण १,८६,५०९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पुढच्या टप्प्यांत जाण्यासाठी आणि टियर २ परीक्षेत सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत. संख्येत पाहायला गेले तर, जूनियर सांख्यिकी अधिकारी पदांसाठी 8,436 उमेदवार टियर २ परीक्षेसाठी पात्र केले गेले आहेत. सांख्यिकीय अन्वेषक ग्रेड II पदासाठी आयोजित परीक्षेसाठी २,८३३ उमेदवारांना उपस्थित राहता येणार आहे. तसेच सर्व पदांसाठी 1,65,240 उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. SSC CGL परीक्षा टियर १ परीक्षा ९ सप्टेंबरपासून ते २४ सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आली होती. तसेच ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अंतिम उत्तर संच जाहीर करण्यात आला होता.
सूची १ कट ऑफ
एससीसाठी कटऑफ 143.53855, एसटीसाठी 135.23007, ओबीसीसाठी 160.65216, ईडब्ल्यूएससाठी 161.73406, आणि यूआरसाठी 167.02061 आहे. याशिवाय, ओएचसाठी 133.35717, एचएचसाठी 95.45162, तर व्हीएचसाठी 122.51903 कटऑफ निश्चित करण्यात आले आहे.
सूची २ कट ऑफ
एसटीसाठी कटऑफ 134.49545, ओबीसीसाठी 161.13462, ईडब्ल्यूएससाठी 163.50858, आणि यूआरसाठी 170.65672 आहे. याशिवाय, एचएचसाठी 60.66162, व्हीएचसाठी 92.05218, तर अन्य-पीडब्ल्यूडीसाठी 40.30795 कटऑफ निश्चित करण्यात आले आहे.
सूची ३ कट ऑफ
एससीसाठी कटऑफ 126.45554, एसटीसाठी 111.88930, ओबीसीसाठी 146.26291, ईडब्ल्यूएससाठी 142.01963, आणि यूआरसाठी 153.18981 आहे. तसेच, ईएसएमसाठी 69.92674, ओएचसाठी 113.10008, एचएचसाठी 64.79156, व्हीएचसाठी 102.97465, आणि अन्य-पीडब्ल्यूडीसाठी 45.74000 कटऑफ निश्चित करण्यात आले आहे.