GOOGLE (फोटो सौजन्य- pinterest)
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना देखील google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी तुम्ही अर्ज देखील करू शकता. गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर इंटरशिप करत असताना मासिक वेतनाची सुरुवात एक लाखापासून होणार आहे.
Free Education: केंद्रीय महाविद्यालयात मिळणार मोफत शिक्षण; मात्र ‘या’ विद्यार्थ्यांनाच होणार फायदा
भारत समेत अनेक देशात गुगलचा ऑफिस आहे. परंतु इथे नौकरी भेटणं सोपं नाही आहे. गूगल मध्ये नौकरीसाठी कठीण टेस्ट आणि २-३ इंटरव्यू पास करावं लागत. डब्लिन यूनिवर्सिटीच्या कंप्यूटर साइंस मध्ये एमएससी करत असलेल्या स्वरूपने गुगल एसडब्ल्यूई इंटर्नशिप मुलाखतीची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. गूगल सॉफ्टवेअर इंजिनियर इंटर्नची सॅलरी १ लाखापेक्षा जास्त असते. स्वरूपचा सिलेक्शन गूगलच्या समर इंटर्नशिपसाठी झालं आहे.
गूगलचा इंटरव्यू राउंड क्लीयर करणं हे सोपी नाही आहे. या प्रक्रियेच्या मधातच अनेक युवा निराश होतात. गुगल मध्ये नौकरी साठी तुम्ही इंटर्नशिप पासून सुरवात करू शकता. जर तुमचा सिलेक्शन होत असेल तर नौकरी भेटणं थोडं सोपी होते. आणि तुम्ही तिथला वर्क कल्चर पण समजू शकता. गुगलच्या वेबसाईट वर करियर्स सेक्शन मध्ये इंटर्नशिप आणि वॅकन्सीची माहिती मिळू शकते. स्वरूप ने लिंक्डइनवर गुगल एसडब्ल्यूई इंटर्नशिप इंटरव्यू प्रक्रिया समाजवले आहे.
गूगल मध्ये इंटर्नशिप कशी मिळते
गुगलच्या विविध विभागांमध्ये इंटर्नशिपसाठी वेळोवेळी अर्ज मागवले जातात. गुगल इंटर्नशिप सहसा उन्हाळी आणि हिवाळी सत्रांमध्ये विभागल्या जातात.
गुगल इंटर्नशिप मुलाखतीची तयारी कशी करावी
1. अप्लिकेशन आणि ऑनलाईन मूल्यांकन
स्वरूपने आपल्या लिंक्डइन पोस्टची सुरवात अप्लिकेशन प्रोसेसने केली आहे. त्यांने Google Careers पेज वर सॉफ्टवेयर इंजिनियरिंग इंटरशिपसाठी अर्ज केला होता. काही दिवसानंतर त्यांना Online Assessment (OA) साठी इन्व्हिटेशन पाठवण्यात आले होते. ऑनलाइन असेसमेंटमध्ये डेटा स्ट्रक्चर्स आणि एल्गोरिदमशी जुडलेले २ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं होत.स्वरूपने दोन्ही प्रश्न सोडवले होते. याच्या काही दिवसानंतर टेक्निकल इंटरव्यू साठी इनविटेशन पाठवण्यात आले होते.
2. टेक्निकल इंटरव्यू
स्वरूप ने पुढे लिहलं, की एकाच दिवसात त्यांचे दोन इंटरव्यू झाले होते. दोन्ही ४५-४५ मिनिटांचे होते. यात DSA प्रॉब्लेम्सला सोडवण्यावर फुल फोकस केला होता. दोन्ही इंटरव्यू एक मूळ समस्येपासून सुरु झाले होते. मग काही फॉलो-अप प्रश्न होते. त्यामध्ये उपाय ऑप्टिमायझ करणे, प्रकरणे हाताळणे इत्यादींचा समावेश होता. मुलाखत घेणाऱ्याला स्वरूप त्याच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या पद्धती सर्वोत्तम निवडेल हे पहायचे होते.
टेक्निकल इंटरव्यूची तयारी कशी केली पाहिजे?
१- नीट विचार करा आणि तुमचा मुद्दा स्पष्टपणे मांडा. मुलाखत घेणाऱ्याला तुमच्या रीजनिंगची समज पहायची असते.
२- जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर समस्या सोडवण्यापूर्वी विचारा. यामुळे, तुम्ही तो प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.
३- वेळ आणि स्थानाच्या गुंतागुंतीची चांगली समज असणे. एक दृष्टिकोन दुसऱ्यापेक्षा चांगला का आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
४- मुलाखत घेणारा तुम्हाला विचारू शकतो की तुम्ही समस्या कशी सोडवली. यासाठी औचित्य सिद्ध करण्यासाठी तयार राहा.
3. टीम मैचिंग
या राउंडला होस्ट मॅचींग देखील म्हंटले जाते. गुगल इंटर्नशिपचा ऑफर देण्याआधी इंटर्नल होस्ट आणि प्रोजेक्ट सोबत मॅच करण्याचा पर्याय देतात.
EMEA (Europe, Middle East, and Africa) मध्ये गुगलचे जे ऑफीस आहे, तिथले होस्ट टेक्निकल इंटरव्यू पास करणे वाले उम्मीदवारांची प्रोफाइल चेक करतात. जर कोणता होस्ट कश्यात रुची घेत असेल तर त्याच्या सोबत एक इंटरव्यू शेड्युल करतो. स्वरूपला डबलिनची गुगल ऐड्स मशीन लर्निंग एसआरई टीमचे होस्ट ने कॉन्टॅक्ट केला होता.
त्यांनी सांगितले की होस्ट मॅचिंग मुलाखत संवादात्मक होती. यामध्ये, होस्टने सुरुवातीलाच त्याला प्रोजेक्टबद्दल सांगितले. यानंतर, स्वरूपची पार्श्वभूमी, सध्याची शैक्षणिक स्थिती, मशीन लर्निंगच्या काही संकल्पना आणि कामाचा अनुभव याबद्दल चर्चा झाली. होस्ट आणि स्वरूपची सकारात्मक पुष्टी झाल्यानंतर होस्ट मैचिंग प्रक्रियेला कंप्लिट समजले गेले.
टीप: फक्त तांत्रिक मुलाखत उत्तीर्ण झाल्याने होस्ट मैचिंग प्रक्रियेला हमी मिळत नाही. होस्ट उपलब्ध असतील आणि प्रोजेक्ट ऑनलाईन होतील तेव्हाच अंतिम निवड होईल.
4. गुगलमध्ये इंटर्नशिपसाठी ऑफर लेटर
होस्ट मॅचिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी, स्वरूप जी यांना गुगलकडून ऑफर लेटर मिळाले. त्याला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग (साइट रिलायबिलिटी) इंटर्न म्हणून उन्हाळी इंटर्नशिपसाठी गुगलमध्ये सामील व्हावे लागेल हे निश्चित झाले. स्वरूपच्या लिंक्डइन पोस्टवर गुगलने कॉमेंट केले आहे. गुगल इंटर्नशिप प्रक्रियेचा रोडमॅप दिल्याबद्दल धन्यवाद. हे इतरांना अर्ज करण्यास आणि प्रक्रिया समजून घेण्यास मदत करेल असे गुगल कडून लिहिले आहे.
बिहारमध्ये असिस्टंट प्रोफेसरची निघाली बंपर भरती, जाणून घ्या कोणत्या डिग्रीची गरज