फोटो सौजन्य - Social Media
IAS युवराज मरमट आणि IPS पी. मोनिका यांची प्रेम कथा UPSC क्षेत्रात नाव करून आहे. मुळात, याचे कारण असे की या दोघांनी अगदी दोन हजारांमध्ये लग्न हुरकले होते. दोघेही त्यावेळी सिव्हिल सर्व्हिसमध्ये होते. त्यांनी कसलाही गाजावाजा न करत अगदी सध्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले. आज दोघेही नवरा बायको मोठ्या पदांवर कार्यरत आहे.
IAS युवराज मरमट राजस्थानचा राहणारा होता. त्याचे शिक्षण अभियांत्रिकी क्षेत्रातून झाले आहे. त्याने B.Tech चे शिक्षण घेत IES पात्र केले. युवराजने IOC सहदेखील काम केले आहे. पण त्याला देशासाठी काही तरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने UPSC पात्र करण्याचे ठरवले. २०१६ मध्ये त्याने पहिले प्रयत्न केले पण त्याला UPSC मध्ये यश आले नाही. 2021 मध्ये सहा वेळा प्रयत्न करून त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केले. ऑल इंडिया रैंक (AIR) 458 मिळवून तो रायगढ़ (छत्तीसगढ) मध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून कामाला होता.
IPS पी. मोनिका ही तेलंगणाची सुपुत्री असून तिच्या शिक्षणाची सुरुवात वैद्यकीय क्षेत्रातून झाली. तिने फार्मोकॉलॉजी या क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले असून, आरोग्यविज्ञान आणि औषधशास्त्रातील तिचा गाढा अभ्यास तिला नेहमीच प्रेरणा देणारा ठरला. फार्मोकॉलॉजीमध्ये शिक्षण घेत असतानाच तिच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, कठोर मेहनत आणि समस्यांवर तर्कसंगत दृष्टिकोन यांचा संगम दिसून येत होता.
शिक्षणात उत्कृष्टतेसह, पी. मोनिकाला संगीताचीही अत्यंत आवड आहे. ती विविध संगीत वाद्ये वाजवण्यात प्रवीण असून, संगीताच्या माध्यमातून तिने मानसिक तणाव कमी करण्याचा आणि स्वतःला प्रोत्साहित करण्याचा मार्ग शोधला. याशिवाय ती खेळाडू म्हणूनही अत्यंत उत्तम आहे; शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी ती नियमितपणे खेळामध्ये सहभागी होते आणि संघभावनेत पारंगत आहे. या गुणांमुळे तिचे नेतृत्व कौशल्य, मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा उत्तम संगम तयार झाला आहे, जो भविष्यातील IPS अधिकारी म्हणून तिला सक्षम बनवतो.
दोघांची भेट मसुरी येथील एका अकॅडेमीमध्ये झाली. दोघेही स्पर्धा परीक्षांचे शिक्षण घेत होते. मसुरी येथे स्थित असलेल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) येथे दोघांमध्ये मैत्री झाली मग प्रेम झाले आणि मग लग्न झाले. मुळात, युवराज आधी वेगळ्या कॅडरमध्ये कार्यरत होता. पण नंतर त्याने त्याच्या पत्नीसाठी तेलंगणा येथे बदलून घेतले. त्यांची यशोगाथा देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे. आता दोघेही एकत्र कार्यरत आहेत.