फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने युनिव्हर्सिटी ग्रॅण्ट कमिशन (UGC) नेट (NET) २०२४ परीक्षेसंबंधित महत्वाची घोषणा केली आहे. ऑगस्टच्या २१ तारखेला NET २०२४ परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रही जाहीर करण्यात आले आहे. मुळात, युजीसी नेट २०२४ परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आयोजित करण्यात आलेली पुर्नपरीक्षा नव्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने युजीसी नेट २०२४ परीक्षेसंदर्भात नवीन परीक्षेचे पॅटर्न जाहीर केले आहे. या बाबतीत घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेदरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे सांगण्यात आले कि, युजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) परीक्षा २०२४ पूर्णपणे संगणक आधारित असणार आहे. एकंदरीत, युजीसी नेट परीक्षा २०२४ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) माध्यमातून घेण्यात येणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे युजीसी नेट २०२४ परीक्षेचे आयोजन जून महिन्यातील १८ तारखेला करण्यात आले होते. परंतु, त्याकाळी देशभरामध्ये शैक्षणिक क्षेत्रात निराशेचे वातावरण होते. त्यावेळी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचे पेपर लीक झाले होते. त्याचबरोबर युजीसी नेट परीक्षा २०२४ बाबतीतही अनेक अफवा अगदी हव्यासारख्या पसरल्या होत्या. विद्यार्थ्यांमध्ये भीती तसेच निराशेचे वातावरण होते. त्यामुळे १८ जूनला आयोजित केलेली युजीसी नेट परीक्षा २०२४ स्थगित करण्यात आली. विशेष म्हणजे या परीक्षेचे आयोजन २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान केले जात आहे.
युजीसी नेट परीक्षा २०२४ पूर्णपणे संगणकाच्या (CBT) माध्यमातून घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना पुन्हा युजीसी नेटच्या जुन्या पॅटर्नने परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. काही वर्षांपासून युजीसी नेट परीक्षा लिखित स्वरूपात घेतली जात आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्याला रेड सिग्नल देत परीक्षा CBT मोडमध्ये घेण्याचे योजिले आहे. युजीसी नेट परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप तसेच असिस्टंट प्रोफेसरच्या पदी नियुक्ती होऊ शकते. तसेच या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भविष्यात PHD ही करू शकतात.
युजीसी नेट २०२४ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. या परीक्षेत उपस्थित राहणार असलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाईन स्वरूपात डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र डोवनलोड करण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रॅण्ट कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.






