फोटो सौजन्य - Social Media
या डिझाइनचा समावेश आंतरराष्ट्रीय डिझाइन वर्गीकरणातील वर्ग २४ मध्ये करण्यात आला असून, या वर्गात वैद्यकीय आणि प्रयोगशाळा उपकरणांचा समावेश होतो. हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, मेडिकल डिव्हाइसेस आणि अप्लाइड इंजिनिअरिंग या क्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आलेले हे उपकरण रुग्णसेवा अधिक प्रभावी, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत आरोग्यसेवा क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता, हे उपकरण आरोग्यसेवा वितरण प्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवते, असे मत डॉ. श्रीवरमंगई रामानुजम यांनी व्यक्त केले.
या हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाईसद्वारे रुग्णांच्या आरोग्यस्थितीवर सातत्याने आणि अचूकपणे लक्ष ठेवणे शक्य होणार असून, रुग्ण निरीक्षण, प्राथमिक निदान प्रक्रिया आणि उपचार व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनवण्यास यामुळे मदत होणार आहे. विशेषतः दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी तसेच वृद्ध आणि घरगुती उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हे उपकरण उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. या बहुविषयक संशोधन प्रकल्पात डॉ. नीलम शर्मा, अभिजित सुधाकर, डॉ. रवी शंकर पांडेय, डॉ. उपेंद्र कुमार, डॉ. राजीव रंजन राय आणि डॉ. नितीश पाठक यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, विविध शैक्षणिक आणि तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन हे संशोधन पूर्ण केले आहे.
आरोग्य निरीक्षण प्रणाली, वैद्यकीय उपकरणे आणि डिजिटल हेल्थ उपाययोजना यांच्या माध्यमातून रुग्णसेवा अधिक सुलभ, विश्वासार्ह आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने हे संशोधन महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संशोधन क्षमतेचा आणि नवोन्मेषी दृष्टिकोनाचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला सन्मान विद्यापीठासाठी अभिमानास्पद असून, भविष्यातील हेल्थकेअर संशोधनासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.






