पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या, आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा कधी होणार? जाणून घ्या नव्या तारखा (फोटो सौजन्य-Gemini)
यापूर्वी, महापालिका निवडणुकीमुळे १४ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान झालेल्या परीक्षाही विद्यापीठाला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यानंतर या परीक्षा 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. परंतु राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात निवडणूक आचारसंहिता जाहीर केल्यानंतर, विद्यापिठाने ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सर्व अर्ध-नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा १७ फेब्रुवारी, १८ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी रोजी येत आहे. विद्यापीठाने बुधवारी 28 जानेवारी रोजी दुपारच्या सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्या परीक्षा 23 फेब्रुवारीला दुपारी 2:30 वाजेपासून ते 4:30 वाजेदरम्यान दरम्यान घेतल्या जातील.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाने ९ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सुधारित वेळापत्रकाची माहिती सर्व संबंधित महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना तात्काळ पाठवण्याच्या सूचना विद्यापीठाला देण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांना जास्त त्रास होऊ नये आणि गोंधळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोग या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी निवडणूक वेळापत्रक १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केला होता. २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे, राज्य सरकारने २८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत राज्यात शोक जाहीर केला होता. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी संबंधित ठिकाणी सुरू होईल.






