फोटो सौजन्य: iStock
देशात जेव्हापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आला आहे, तेव्हापासून त्याच्याशी संबंधित अनेक माहिती आणि अफवा पसरत आहेत. AI ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जी डेटा प्रोसेसिंग आणि विश्लेषणाच्या माध्यमातून मशीनला माणसासारखी बुद्धिमत्ता प्रदान करते. याच्या प्रभावामुळे अनेक उद्योग क्षेत्रे आपले उत्पादन आणि सेवा सुधारण्यासाठी AI चा वापर करत आहेत. स्मार्टफोनसारख्या उपकरणांमध्ये AI तंत्रज्ञानाचा समावेश होणे हे एक प्रमुख उदाहरण आहे. स्मार्टफोन्समध्ये AI चा वापर करून, फोनच्या कॅमेऱ्यात उत्कृष्ट फोटो काढता येतात, व्हॉइस असिस्टंट्स अधिक अचूकपणे काम करतात, तसेच यूझर एक्सपीरियन्स सुधारणे शक्य होते.
AI ने अनेक क्षेत्रात क्रांती सुद्धा घडवून आणली आहे. आज यामुळे अनेक जणांचे कठीण काम मिनिटात होताना दिसत आहे. पण ज्याप्रमाणे AI मुळे जॉब्स जाण्याची सुद्धा भीती आहे, त्याचप्रमाणे आशेची किरण म्हणजे यामुळे नवीन जॉब्स सुद्धा निर्माण होणार आहे.
विद्युत विभागामध्ये भरती; लवकर करा अर्ज, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्याप्ती भारतासह जगभरात झपाट्याने वाढत आहे. जगभरात AI सतत आपली पोहोच वाढवत आहे. वास्तविक, AI ने आपले सर्वांचे काम सोपे केले आहे, परंतु त्याच वेळी ते अनेक जॉब्ससाठी धोकादायक देखील मानले जात आहे. विशेषत: येत्या काही दिवसांत लाखो लोकांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील.
पुढे भविष्यात AI ते काम करताना दिसेल जे मानव सहजपणे करत आहे, परंतु दुसरीकडे AI च्या समर्थकांचे म्हणणे आहे की यामुळे भविष्यात नोकरीच्या संधी देखील वाढतील. लोकांना AI क्षेत्रात लोकांना नोकरीच्या कोणत्या नवीन संधी मिळतील, याबद्दल जाणून घेऊया.
IIT मंडीमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; ज्युनिअर असिस्टंटच्या पदासाठी भरती सुरु
AI च्या फिल्डमध्ये लोकांसाठी रोजगाराच्या कोणत्या संधी निर्माण होणार आहेत हे येत्या काही दिवसांत कळेल. वास्तविक, AI मध्ये BSC पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे व्हिडिओ गेम प्रोग्रामर, डेटा एनालिस्ट, मशीन लर्निंग इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर असे अनेक करिअर पर्याय आहेत. बीसीए इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ३ वर्षांचा यूजी कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना एआय प्रोग्राम डिझाइन करायला शिकवले जाते.
याशिवाय, एआय अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी सॉफ्टवेअर विश्लेषक आणि विकासक, अल्गोरिदम विशेषज्ञ, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि संशोधन शास्त्रज्ञ म्हणून करिअर करू शकतात. आयआयटी हैदराबाद या प्रकारचा पदवीपूर्व अभ्यासक्रम करण्याची संधी देते. त्याची सरासरी फी सुमारे 2 लाख रुपये आहे.