
mango
Queen of Fruits: उन्हाळा सुरू होताच बाजारात आंब्यांचा सुगंध सर्वत्र पसरतो. हा आंबा लोक मोठ्या आवडीने खातात आणि त्याला फळांचा “राजा”ही म्हटले जाते. परंतु, अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की, जर फळांचा राजा आंबा असेल तर फळांची राणी कोण असेल? बहुतांश लोकांना याचे उत्तर माहित नसते. चला तर मग जाणून घेऊया फळांची रानी नक्की कोण आहे?
तस पाहता फळांची राणी ही विदेशी फळ आहे, ज्याचे नाव मँगोस्टिन’ (Mangosteen) असे आहे. हे फळ प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियामध्ये आढळत असून याची चव गोड आणि हलकी आंबट असते. याचे बाहेरील कवच गडद जांभळ्या रंगाचे असते आणि आतून ते पांढरे, मऊ आणि रसाळ असते. याची हलकी रचना आणि चव याला खास बनवते.
मँगोस्टिन एक ट्रॉपिकल (उष्णकटिबंधीय) फळ आहे. ज्याला जगातील अनेक भागांत खूप पसंत केले जाते. याचा गर पांढरा आणि खूप मऊ असतो, जो खाण्यात अतिशय स्वादिष्ट लागतो. तज्ञांच्या मते,याची चव आंबा, अननस आणि लिची यांसारख्या फळांच्या मिश्रणासारखी वाटते. हेच वैशिष्ट याला जगभरात प्रिमियम फळ बनवते.
Why Teachers Use Red Pen: पेपर तपासताना शिक्षक लाल पेन का वापरतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण!
हे फळ केवळ चवीतच नाही तर पोषणाच्या दृष्टीने खूप समृद्ध आहे. यामध्ये कॅलरीज आणि फॅट अत्यंत कमी असते. त्यामुळे वजन कमी ठेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगले फळ आहे. याशिवाय यामध्ये पोटॅमशियम, मॅग्नेशियम आणि कॉपर यांसारखी आवश्यक खनिजेही असतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), व्हिटॅमिन ई (Vitamin E) आणि अनेक कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स आढळतात. हे फळ फायबरने परिपूर्ण असल्याने पचनसंस्था मजबूतीसाठी चांगले आहे. या सर्व फायद्यांमुळेच दिसायला सुंदर आणि आरोग्यदायी असणाऱ्या या फळाला फळांची ‘राणी’ म्हटले जाते.