फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Teachers Use Red Pen: शाळा आणि कॉलेजेसच्या परीक्षांमध्ये बहुतांशवेळा उत्तरपत्रिका या लाल पेननेच तपासल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की परिक्षामध्ये उत्तरपत्रिका नेहमी लाल पेननेच का तपासल्या जातात? इतर रंगांच्या पेनची निवड न करता या रंगाचीच निवड शिक्षक का करतात? चला तर मग जाणून घेऊया यामागचे नेमके कारण…
लाल रंगांच्या पेनने पेपर तपासण्यामागचे वास्तविक कारण त्या रंगाची स्पष्टता आहे. लाल रंग हा काळ्या आणि निळ्या शाईपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो. ज्यामुळे परीक्षार्थीने दिलेले गुण आणि शेरे लगेचच दिसून येतात. उत्तरपत्रिकेत जिथे विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहली असतात, तिथे लाल शाई सहजपणे आपले अस्तित्व टिकवून ठेवते. ज्यामुळे मुल्यांकन प्रक्रिया स्वच्छ आणि सुव्यवस्थित बनते.
लाल रंगाच्या पेनचा वापर केवळ शिक्षकांच्या सुविधांसाठीच होत नाही तर यामुळे विद्यार्थ्यांनाही फायदा होतो. जेव्हा विद्यार्थी आपली तपासलेली उत्तरपत्रिका पाहतात, तेव्हा त्यांना त्याचे गुण आणि शेरे लगेचच नजरेस पडतात.यामुळे आपली चूक कुठे झाली आहे आणि कोणत्या प्रश्नामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना लगेच समजते. जर शिक्षकांनी निळ्या किंवा काळ्या पेनचा वापर केला तर विद्यार्थ्यांना त्यांचे उत्तर आणि शिक्षकाचा शेरा यामधील फरक ओळखणे कठीण होऊ शकते. याच कारणामुळे अनेक वर्षापासून लाल पेन मूल्यमापनासाठी सर्वात योग्य मानला जातो.
लाल पेनचा एक फायदा हा सुरक्षेशी जोडला गेला आहे. बहुतांश विद्यार्थी हे परीक्षेत निळ्या किंवा काळ्या पेनने लिहतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने नंतर उत्तरपत्रिकेत बदल केला तर तो सहज पकडला जाऊ शकतो. लाल शाईने केलल्या मूळ मूल्यमापनात आणि जोडले्लया लिखाणात स्पष्ट दिसून येते. याच कारणामुळे परीक्षा बोर्ड आणि विद्यापीठे मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी लाल रंगाच्या पेनला प्राधान्य देतात. यामुळे उत्तरपत्रिकांमधील छेडछाड होण्याची शक्यता देखील कमी होते.
भारतातील अनेक शिक्षण मंडळे आणि विद्यापीठे मूल्यामापन प्रक्रियेसाठी विषेश मार्गदर्शक तत्वे जारी करते. यामध्ये अनेकदा शिक्षकांना लाल पेन किंवा ठरवून दिलेल्या रंगाच्या शाईनेच उत्तरपत्रिका तपासण्याचे निर्देश दिले जातात.त्यामुळे लाल पेन ही केवळ परंपरा नसून शिक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग बनली आहे, जो निष्पक्ष आणि स्पष्ट मूल्यमापन सुनिश्चित करण्यात मदत करतो.






