jesus christ यांचा जन्म झाला म्हणजे २५ डिसेंबर दिवशी नातळ हा सण साजरी केला जातो. त्या निमित्ताने मुंबईकरांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, हे सेलिब्रेशन करताना नाच, गाणी करत आनंद व्यक्त केला. या सेलिब्रेशन चा व्हिडिओ सोशल मिडिया वर तुफान राडा करत आहे.
#WATCH | People dance & sing at Marine Drive in Mumbai as they celebrate the festival of #Christmas pic.twitter.com/kG5nSwBTfl
— ANI (@ANI) December 25, 2022
वांद्रे स्थित सेंट पीटर्स चर्च मध्ये ख्रिस्मसचा खास उत्साह असतो. हे कॅथलिक चर्च त्याच्या ऐतिहासिक Romanesque vibe सह ख्रिसमसच्या सणाची खरी रंगत तुम्हांला यंदा आठवणींच्या स्वरूपात देऊ शकेल. दक्षिण मुंबईला रात्रीच्या वेळी न्याहाळण्याची मज्जाच काही और आहे. ब्रिटीश कालीन संस्कृतीचे भास या भागात अनेकदा जाणवतात. कुलाबा येथील वूडहाऊस चर्च हे मुंबईमधील 100 वर्षांहून जुन्या काही चर्चपैकी एक आहे. येथील आर्टवर्क, स्थापत्यशास्त्र आणि कलाकुसर भारावून टाकणारी आहे. ही इमारत 1998 साली heritage building म्हणून जाहीर करण्यात आली आहे.