गुजरात: गुजरात येथील बनासकांठा जिल्ह्यातील एक हत्येच्या थराराने संपूर्ण गुजरात हादरून गेला आहे. एका १८ वर्षीय मुलीची तिच्याच वडिलांनी आणि काकांनी मिळून हत्या केली. हत्या झालेल्या मुलीचे नाव चंद्रिका चौधरी आहे. ति एमबीबीएसचे स्वप्ने पाहत होती.तर आरोपीचे नाव सेधाभाई आणि काका शिवभाई पटेल असे नाव आहे. चंद्रिकाच्या दोन्ही काकांना अटक करण्यात आली आहे तर तिच्या वडिलांचा शोध सुरु असलायची माहिती पोलीस अधीक्षक सुमन नाला यांनी दिली आहे.
का करण्यात आली हत्या?
चंद्रिका आणि तिचा प्रियकर हरेश चौधरी हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र तिच्या कुटुंबाचा या नात्याला तीव्र विरोध होता. कुटुंबाला तिचं दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून द्यायचं होत. याबाबत चंद्रिकाने हरिशला संगितलं होत. तिचा जीव धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली होती. २४ जून रोजी रात्री उशिरा तिने हरिशला इंस्टाग्रामवर मेसेज पाठवला. “मला घेऊन चल,नाहीतर माझं कुटुंब माझ्या इच्छेविरुद्ध माझं दुसरीकडे लग्न लावून देईल. जर मी लग्नाला तयार झाले नाही तर ते मला मारून टाकतील मला वाचाव”
सकाळी सापडला मृतदेह
मेसेजनंतर काही तासांनी चंद्रिकेचा मृतदेह तिच्या घरात आढळला. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू किंवा आत्महत्या असल्याचं दाखवण्यात आला होता. मृत्यू प्रमाणपत्र देऊन कुटुंबाने हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा केला. अगदी तिच्या अंत्यसंस्काराची घाईघाईत व्यवस्था करून नातेवाईकांना आणि पालांपुरमध्ये शिकणाऱ्या भावालाही बोलावले नाही.
चंद्रिकाचा प्रियकर हरेश चौधरीला हा प्रकार संशयास्पद वाटला. त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आणि मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. त्यापूर्वीच, चंद्रिकाला कुटुंब ठार मारू शकतं या भीतीने त्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण सुनावणीच्या तारखेआधीच तिचा मृत्यू झाला होता.
चौकशीत धक्कादायक माहिती समोर
पोलिसांच्या चौकशीत धक्कदायक माहिती समोर आली आहे. चंद्रिकेने घरातून पळून हरेशसोबत राहण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी तिला शोधून कुटुंबाकडे सुपूर्द केलं. २४ जूनच्या रात्री तिने लग्नास नकार दिल्यानंतर वडील आणि काकांनी तिची हत्या करण्याचा कट रचला.
त्रिस्तरीय योजना
पोलिसांच्या मते, आरोपींनी त्रिस्तरीय योजना आखली, तिला पहिल्यांदा दुधातून औषध देऊन तिला बेशुद्ध केलं, त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली, आत्महत्येसारखा आभास निर्माण करण्यासाठी मृतदेह फासावर लटकवले. रात्री काही जणांनी मृतदेह पाहिला तेव्हा आत्महत्या झाल्याचं भासवलं,तर सकाळी इतरांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांनी निष्कर्ष काढला. थरड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून दोघा काकांना अटक करण्यात आली असून, वडिलांचा शोध सुरू आहे.
घरफोड्यांसोबतच उघड्या दरवाजांमधूनही चोऱ्या; पुण्यातील ‘या’ भागातून लाखोंचा ऐवज चोरला