पूर्व वैमन्यस्यातून एका कुटुंबातील चौघांची हत्या, आईसह तीन मुलांना संपवलं, हल्लेखारांनी 12 वर्षाच्या मुलालाही सोडलं नाही!

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एक वृद्ध महिलाही गंभीर जखमी झाली आहे.

    देशभरात दिवाळीच जल्लोष सुरू असताना कर्नाटकातून एक धक्कादायक बातमी (Karnataka Murder News) समोर येत आहे.  कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागे जुने वैमनस्य असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    नेमकं काय घडलं?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी मारेकऱ्याने महिला आणि तिच्या दोन मोठ्या मुलांची हत्या केली,  त्यानंतर 12 वर्षांचा तिसरा मुलगा आत आला आणि त्याचीही वार करून हत्या करण्यात आली.जेव्हा आवाज झाल्यानंतर मृताच्या शेजाऱ्याने घरात घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा मारेकऱ्याने त्याला धमकावले. या हल्ल्यात महिलेच्या सासूलाही चाकूने वार करून गंभीर जखमी केले. सध्या वृद्ध महिलेवर उपचार सुरू आहेत.