माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेला त्रास; छळ हिंगोलीत पण तक्रार पश्चिम बंगालमध्ये, जाणून घ्या प्रकरण नेमकं काय?
हिंगोली : माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून महिलेच्या पती विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२८) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे विवाहितेने पश्चिम बंगाल राज्यातील संक्रेल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार हिंगोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल राज्यातील हावडा येथील श्वेता शर्मा (माटोलीया) या तरुणीचा विवाह सुरज सिताराम शर्मा (रा. साई वृंदावन सोसायटी, एनटीसी हिंगोली) याच्या सोबत ३० एप्रिल २०२१ रोजी झाला होता. विवाहानंतर श्वेता यांना एक महिना चांगले वागवल्यानंतर सुरज याने तिला त्रास देण्यात सुरूवात केली. यादरम्यान सुरज यास क्रिकेट सट्टा खेळण्याचे व्यसन लागले होते. सट्टा बाजारात नुकसान झाल्यानंतर तो दारु पिऊन घरी येत होता व श्वेता यांना शिवीगाळ करत होता.
हेदेखील वाचा : Malad Crime : हस्ताक्षर चांगले नाही म्हणून दिले चटके, ८ वर्षाचा मुलगा जखमी; ट्युशन शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल
तसेच वडिलांकडून पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून तो छळ करू लागला होता. त्याच्या छळाला कंटाळून श्वेता माहेरी निघून गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी संक्रेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये सुरज याच्याकडून छळ केला जात असून, त्याने लग्नातील स्त्रीधन असलेले सर्व दागिने ठेऊन घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
हेदेखील वाचा : Solapur Crime: भेटवस्तू अन् महागड्या हॉटेलमध्ये…, आशा सेविकांकडून गर्भवती महिलांची दिशाभूल; नेमकं प्रकरण काय?
महिलांवरील अत्याचाराचे प्रकार सुरुच
दुसऱ्या एका घटनेत, वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर देखील पुण्यासारख्या शहरात विवाहित महिलांचा छळ आणि छळातून आत्महत्या घडत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात आंबेगावात ‘मयुरी’ने ६ वर्षांच्या चिमुकल्यासह ६ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची घटना घडली. काळेपडळमध्ये सासूकडून हुंड्यासाठी तसेच सोने व पैशांसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेने सिलींग फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासूविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.