जबलपूर: जबलपूरमध्ये हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेन दोन मुलांच्या मैत्रीचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. पैशाच्या वादातुन एका मित्राने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. खून केल्यानंतर त्याने मित्राच्या मृताच्या मृतदेहाचे 10 तुकडे करून नाल्यात फेकले यानंतर मारेकऱ्याने स्वतः आत्महत्या केली. अनुपम शर्मा असे मृताचे नाव असून टोनी वर्मा असं आत्महत्या करणाऱ्या आरोपीच नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे.
[read_also content=”धक्कादायक! प्रियकरासह नको त्या अवस्थेत दिसली सून, भांडाफोड होण्याच्या भितीने मदतीने सासुसाऱ्यांचा गळा चिरुन केला खून https://www.navarashtra.com/crime/the-daughter-in-law-killed-her-mother-in-law-in-delhi-gokulpuri-area-nrps-383162.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता.अनुपम शर्मा गादरवारा नरसिंगपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. अनुपम टोनी वर्मासोबत काम करत होता. मात्र, काही दिवसापुर्वी त्या दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. या वादातून टोनी वर्माने अनुपमची हत्या केली.
अनुपम 16 फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेला होता आणि परत आला नाही. शोध घेतल्यानंतर नातेवाईकांनी संजीवनीनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी हरवल्याची नोंद केली. अनुपमला शेवटचे टोनीच्या घराजवळ दिसले होते. याशिवाय पोलिसांना सीसीटीव्हीही मिळाले होते. त्यात अनुपमसारखा दिसणारा एक माणूस स्कूटरवर दिसला. त्यानंतर पोलिसांना टोनीवर संशय आला. त्यानंतर चौकशी केली असता सत्य समोर आलंं.
आरोपी टोनीने मित्राच्या साहाय्याने हत्या केल्यानंतर लाकूड तोडण्याच्या करवतीने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यांनतर पोत्यात भरलेल्या मृतदेहाचे तुकडे संजीवनीनगर परिसरातील नाल्यात फेकुन दिले होते. पोलिसांनी जप्त केले आहेत.
काही दिवसांनी तपासा दरम्यान टोनीने आत्महत्या केली होती, नंतर पोलिसांचा संशय बळावला होता. दरम्यान, या संदर्भात अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना त्याने लिहिलेली एक सुसाईड नोट आढळली होती, ज्यामध्ये त्याने खूप मोठी चूक केल्याचे लिहिले होते. याआधी तो पोलिसांना तपासात सहकार्य करत होता, पण आता आपण अडकू, असे वाटू लागले. त्यामुळे अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीने त्याने आत्महत्ता केली.