संग्रहित फोटो
अमरावती : गाडगेनगर हद्दीतील सिंधी चौकस्थित आशीर्वाद हॉटेल, बिअर बार फोडून 67 हजार 800 रुपये किमतीची विदेशी दारू लंपास करणाऱ्याला अकोट येथून ताब्यात घेऊन 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (दि.17) करण्यात आली. गजानन अरुण आत्राम ( 41, रा. अशोकनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
हेदेखील वाचा : खळबळजनक ! दरोड्याला प्रतिकार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला बेदम मारहाण; पत्नीचा मृत्यू तर पतीच्या मेंदूला गंभीर मार
प्रकाश हसमदास सोमनानी (45, रा. सहकारनगर, अमरावती) यांनी शुक्रवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. चोराने बारमधील गल्ल्यातील 7 हजार रुपयांची रोख, बिलिंग मशिन, संगणक, मॉनिटर, विदेशी कंपनीच्या दारुच्या बॉटला असा एकूण 67 हजार 800 रुपयांचा माल चोरून नेला. या घटनेनंतर सोमनानी यांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गजानन हा सीसीटीव्हीत दिसून आला. त्यामुळे आरोपीविरोधात गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 334 (1), 305 (a) अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. गुन्ह्याच्या तपासात गाडगेनगरच्या डी.बी. पथकाने आरोपीचा शोध घेतला आणि अवघ्या 12 तासांत अकोटच्या हिवरखेड रोडवरून ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने गाडगेनगर हद्दीतील गुन्हा केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून एलजी कंपनीचे कॉम्पुटर मॉनिटर, वायफाय राऊटर, बिलींग मशीन प्रिंटर व कॉम्प्युटर असा एकूण 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण पाटील व पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात व गाडगेनगर डी.बी. प्रमुख एपीआय मनोजकुमार मानकर, पोलिस हवालदार भारत वानखडे, संजय इंगळे, जयसेन व वानखडे, गुलरेज खान, महेश शर्मा, नितीन कामडी यांनी पार पाडली.
दरोड्याला प्रतिकार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला बेदम मारहाण
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात सशस्त्र दरोडेखोरांचा प्रतिकार करताना झालेल्या मारहाणीत डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला. तर पशुवैद्यकीय डॉक्टर गंभीर जखमी झाले. ही घटना बुलढाण्याच्या मोताळा दाभाडी येथे रविवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Crime News: विवाहित पुरुषाने डॉक्टर तरुणीला दिले लग्नाचे आमिष; अन् तिच्याकडून थेट …; वाचा दुर्दैवी घटना