परभणीत विवाहितेने संपवले जीवन (फोटो- istockphoto)
परभणी: सध्या पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. हुंड्याच्या कारणामुळे वैष्णवीने आपले जीवन संपवले. मात्र राज्यात अशा अनेक घटना घडतंय दिसून येत आहेत. हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचाराची बळी ठरलेल्या वैष्णवीला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केली. यानंतर संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आता परभणी जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने आपले जीवन संपवले आहे.
परभणी जिल्ह्यातील झरी या भागातील एका विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच आता परभणी जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. महिलेचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनीच सासरच्यांनी विवाहीतेला छळण्यास सुरुवात केली.
सासरकडील मंडळी सुनेला त्रास देत होते. तुला स्वयंपाक येत नाही आशा प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली. विवाहितेचा पती देखील रात्री दारु पिऊन घरी आल्यावर तिला मारहाण करत असे. त्यानंतर सासरच्या जाचाला कंटाळून पत्नी माहेरी आली. गेले दोन वर्षे टी आपल्या माहेरी राहत होती. सासरकडील लोकांनी तिला घरी आणण्यास नकार दिला.
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. एके दिवशी विवाहित स्त्री आपल्या पतीशी फोनवर बोलत होती. त्यानंतर लगेचच त्या महिलेने खोलीत जाऊन फॅनला ओढणी बांधली आणि गळफास लावून घेतला. दरम्यान हा प्रकार लक्षात येताच तिच्या वडिलांनी तल रूग्णालयात नेले. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.
पुण्यातील प्रकरण काय?
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणामध्ये तिच्या सासऱ्याच्या राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले. वैष्णवी हगवणे हिला तिच्या नवऱ्यासह सासरा, सासू आणि नंणदेने मारहाण केली असून तिच्या शरिरावर अनेक व्रण असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कस्पटे परिवाराची भेट घेतली आहे.
Vaishnavi hagawane : रुपाली चाकणकर यांनी घेतली कास्पटे परिवाराची भेट; मात्र दारातच विचारला गेला जाब
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या माहेरच्या कास्पटे परिवाराची भेट घेतली. यावेळी त्यांनी वैष्णवीच्या आई वडीलांचे सांत्वन देखील केले. तसेच माध्यमांशी संवाद देखील साधला आहेत. रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली की, वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी आज पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेत पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता. कायदा,सुव्यवस्था व प्रशासन त्यांचे काम उत्तमरित्या करत आहे.गुन्हा नोंद आहे,आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.