लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य (Photo : Suicide)
तुमसर : क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना डोंगरला येथे गुरुवारी (दि.19) उघडकीस आली. आयुष सुखलाल बघेले (17, रा. डोंगरला) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे.
हेदेखील वाचा : Tirupati Laddu Controversy: तिरूपतीच्या प्रसादात चरबी आढळल्याचे प्रकरण; देवस्थानचे सदस्य मिलिंद नार्वेकर म्हणाले…
आयुष हा तुमसर येथील इंदुताई शाळेतील विज्ञान शाखेच्या बारावीचा विद्यार्थी होता. अभ्यासाकरिता तो वरच्या खोलीत जायचा. मात्र, घटनेच्या दिवशी उशिरापर्यंत खाली न आल्याने घरच्यांनी जाऊन बघितले असता आयुष दोराच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केले.
अनूचित घटनांमध्ये वाढ
एका अश्लील फेक कॉलचा बळी पडून तुमसर येथील पिंकू ऊर्फ शांतनू शिवबालक चाचिरे (32, रा. तिलक वॉर्ड, देव्हाडी) याने गुरुवारी (दि. 12) माडगी पुलावरून वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली होती. 9 दिवसांचा कालावधी लोटूनदेखील पिंकूचा मृतदेह अद्यापही करडी पोलिसांना गवसला नाही. त्यात अल्पवयीन आयुषच्या आत्महत्येमुळे तालुक्यात अनुचित घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
तुमसर पोलिस करणार घटनेचा तपास
आयुषने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमध्ये तांत्रिक फ्रॉड, शाळेचे अँगल, मित्रांच्या सहवासातील नजीकच्या घटना या सर्व बाबी तुमसर पोलिस तपासात घेणार असल्याची माहिती आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime News: गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरटयांनी केली हातसफाई; ३० तासांमध्ये ३०० मोबाईल चोरीला