संग्रहित फोटो
पोलिसांच्या माहितीनुसार, दिलावर सिंग आणि प्रेयसी यांच्यामध्ये २०१९ पासून प्रेमसंबंध होते. परंतु, त्या तरुणींचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय आरोपीच्या मनात होता. दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह होणार असल्याची माहिती दिलावरला मिळाल्यानंतर, त्याने पिंपरी-चिंचवडमधील काळा खडक येथील लॉजवर नेले आणि तिचा मोबाईल तपासला.
मोबाईलमध्ये तिच्या दुसऱ्या प्रियकराचे खाजगी फोटो सापडल्यावर, चिडलेल्या दिलावरने प्रियसीवर चाकूने सपासप वार केले. हत्या केल्यानंतर आरोपी थेट कोंढवा पोलीस ठाण्यात गेला आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीकडून कबुली घेतली. कोंढवा पोलीसांनी तात्काळ वाकड पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर प्रेयसीची हत्या केल्याचे निश्चित झाले. वाकड पोलीस आता घटनेचा सखोल तपास करत असून, आरोपीला न्यायालयीन कारवाईसाठी सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हॉटेलमध्ये वेटरकडून ग्राहकावर हल्ला
मावळ तालुक्यातील जांभूळ गावात जुने मुंबई–पुणे महामार्गालगत असलेल्या सनराईज हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन वेटरनी ग्राहक आणि त्याच्या मुलावर लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अज्ञात वेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ६ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास जांभूळ गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत सदानंद संजु चौधरी (वय ५०, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. गावठाण, कामशेत) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.






