File Photo : Accident
शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या बजरंगवाडी येथे भरधाव पिकअपचा भीषण अपघात झाला. यामध्ये पिकअप रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन उलटून एकजण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अज्ञात पिकअप चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने राजकारण ढवळलं; धनंजय देशमुख पुराव्यानिशी गाठणार भगवान गड
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावरून रात्रीच्या सुमारास (एमएच १४ जेएल ३२४०) पिकअप भरधाव वेगाने अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने जात असताना पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप भरधाव वेगाने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन रस्त्याचे कडेला उलटला. यावेळी सदर रस्त्याच्या कडेला असलेल्या अतुल नाणेकर यांना पिकअपची धडक बसून ते जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले. तर पोलीस व नागरिकांनी सदर जखमी पिकअप चालकाला रुग्णालयात हलवले.
त्यानंतर उलटलेला पिकअप सरळ करत बाजूला केला. याबाबत सोमनाथ लक्ष्मण सांडभोर (वय ३४, रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी या पिकअपवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवलदार हनुमंत गिरमकर हे करत आहेत.
बस उलटून अपघात; 17 प्रवासी जखमी
दुसऱ्या घटनेत, लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस उलटून अपघात झाला. या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील कसाराखुर्द गाव हद्दीत घडली. हे वऱ्हाड मुंबई-कुलाबा येथून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या ठिकाणी जाताना हा अपघात घडला.
राज्यातील अनेक भागातून अपघाताच्या घटना उघडकीस
राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना रास्ता पेठेत घडली आहे. याप्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यंकट रामण (वय ७४, रा. वैष्णवी अपार्टमेंट, रास्ता पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis On Budget 2025: “… हा निर्णय मैलाचा दगड ठरेल”; ‘बजेट’वर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया