Photo Credit- Social Media अशोक धोडी यांच्यानंतर आणखी एका शिवसेना जिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला
पालघर: पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर जीवघेण्या हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. पालघरचे बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या त्यांच्या सख्ख्या भावानेच केल्याची धक्कादायक घटना अद्याप ताजी आहे. मुंबईवरून परत येत असताना धोडी यांच्या लहान भावाने त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. अशोक धोडी 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. हे प्रकरण ताजे असतानाच जव्हार तालुक्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय घोलप यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले आहे.
जुगाराच्या अड्ड्याचा प्रतिकार करणाऱ्यांवर जुगारी व त्यांच्या सहकार्यांनी हल्ला केला, ज्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहून पोलिसांनी ३० जानेवारी रोजी सात आरोपींना अटक केली. या आरोपींमध्ये निर्मला फर्नांडिस, फ्रान्सिस फर्नांडिस, मायकल फर्नांडिस, नीलम फर्नांडिस, ज्योती फर्नांडिस, कलीम काझी आणि त्याची पत्नी यांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे.
यंदा नेमकी कधी आहे नर्मदा जयंती? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत
पालघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरणाचा मुद्दा चर्चेत होता. अशोक धोडी यांच्या सख्या भावानेच त्यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या भावाला अटक केली. त्यांच्या खुनामागे बाजारातील अवैध दारू धंद्यांमधील वाद असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. अशोक धोडी यांचे प्रकरण ताजे असतानाच पालघरमधील जव्हार तालुक्यातील एक जुगार अड्डा चर्चेत आला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय घोलप यांनी सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी जुगार अड्डा चालवणाऱ्यांविरोधात तक्रार केली होती.
विजय घोलप यांनी जव्हार परिसरातील बिलाडी जुगार अड्डा बंद करावा, यासाठी जव्हार पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. घोलप यांनी केलेल्या तक्रारीमुळे त्यांच्यावर राग धरून 29 जानेवारी त्यांच्यावर रोजी हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्या वादातून निर्मला फर्नांडिस, फ्रान्सिस फर्नांडिस, मायकल फर्नांडिस, नीलम फर्नांडिस, ज्योती फर्नांडिस, कलीम काझी आणि कलीम काझी याची पत्नी यांच्यावर आरोप आहे. हे सर्व आरोपी जव्हार येथील डॅम आळी भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे. रविवारी (2 फेब्रुवारी) गांधी चौक येथे त्यांच्या जुन्या घराजवळ थांबले होते. यावेली विजय घोलप यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात घोलप यांची सहा तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाली आणि त्यांना शारीरिक दुखापत झाली.
Bangladesh Premier League मध्ये आणखी एक लाजिरवाणा प्रकार, बस चालका
घोलप यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्यामुळे, सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांवर होणारे हल्ले चिंता निर्माण करत आहेत. या हल्ल्यांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे आणि अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.