Solapur Crime: सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वासरू दूध पीत नाही म्हणून त्याला आपल्या मांडीत दाबून अन् मान धरून भांड्यात तोंड घातले. जबरदस्तीने दूध पाजल्याने काही वेळातच आईसमोरच त्या वासराने आपला जीव सोडला. ही घटना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून गोवंशाचे जतन संवर्धन करण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या गोशाळेतील आहे. या गोशाळेतील मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी असे केल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे .
नेमकं काय घडलं?
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेत समितीच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने वासराला दूध पाजण्याचा प्रयत्न केला. वासरू दूध पीत नसल्याने त्याला जमिनीवर दाबून, मांडीत पकडून, मान धरून जबरदस्तीने भांड्यात तोंड घालण्यात आले. काही वेळातच वासराने आपल्या आईसमोरच प्राण सोडला, हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते. ही घटना 23 एप्रिल रोजी घडल्याची माहिती समोर आली असून, अद्याप मंदिर प्रशासनाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रीया येत आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही होत आहे.
सुरक्षारक्षकाचीच सुरक्षा धोक्यात; चाकूने भोसकून केली हत्या, मध्यरात्री घडला थरार
आरोपींनी विरोध करणाऱ्या सुरक्षारक्षकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास प्रजापतीनगरात घडली. वाठोडा पोलिसांनी खून आणि लूटपाट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. कुणाल भैयालाल वानखेडे (वय 20) आणि घनश्याम ऊर्फ अनूप बबली वंजारी (वय 23, दोन्ही रा. भांडेवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या घटनेत एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. लक्ष्मण मुळे (वय 48, रा. भरतवाडा रोड, पारडी) असे हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरिषकुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनात बीट मार्शल (पोलिस हवालदार) चंद्रकांत निंबार्ते आणि पोलिस शिपाई किरण गवई हे दोघेही गस्तीवर होते.
भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना तिघांनी एका डिलिव्हरी बॉयला लुटल्याची माहिती दिली. आरोपी भांडेवाडीच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाल्याने इतर बीट मार्शल्सना सूचना देण्यात आली. प्रजापतीनगरातील एका निर्माणाधीन इमारतीजवळ एका दुचाकीवर दोघे जण दिसले. अभिलेखावर असल्याने पोलिसांनी त्याला ओळखले. मात्र, तिघेही दुचाकीने पळाले.
30 हजाराची लाच मागणं भोवलं! महिला पोलीस हवालदारासह दोघांना रंगेहात पकडले