भारत वि पाकिस्तान सामाना(फोटो-सोशल मीडिया)
IND vs PAK Final : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमधील अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत साहिब जादा फरहानच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद १४६ धावांच करू शकला. भारताला विजयासाठी १४७ धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा : BCCI झुबीन गर्ग यांना संगीतमय श्रद्धांजली वाहणार! विश्वचषक उद्घाटन समारंभात पार पडेल विशेष सादरीकरण
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामान्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. पाकिस्तान संघाची सुरवात शानदार झाली. पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी पहिल्या विकेट्ससाठी ८४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर साहिबजादा फरहान अर्धशतक करून बाद झाला. त्याने ३८ चेंडूत ५७ धावा केल्या. त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले.
त्यांनंतर सैम अयुब 14 धावा करून बाद झाला. फखर जमानने डाव सावरला पण तो देखील ४६ धावा करून वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला. त्यानंतर पाकिस्तान संघाचे फलंदाज एकामागून एक फलंदाज बाद होत गेले. हुसेन तलत १, सलमान अली आगा ८, मोहम्मद हरिस ०, मोहम्मद नवाज ६, शाहीन शाह आफ्रिदी ०, फहीम अश्रफ ०, हरिस रौफ ६ धावा करून बाद झाले. तर अबरार अहमद १ धावा करून नाबाद राहीला. भारताकडून कुलदीप यादवने ४ ओव्हरमध्ये ३० धावा देऊन सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान संघ : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, हुसेन तलत, सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी भारताचा प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
बातमी अपडेट होत आहे..