संग्रहित फोटो
परिसरात प्रचंड घबराट व खळबळ, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू
या हल्ल्यादरम्यान फिर्यादीचे पती प्रशांत रजपूत यांनी जमावातील एका हल्लेखोराला ओळखले असून, त्याचे नाव प्रसाद चिंतामण हिंगे (रा. खोडद, गडाचीवाडी, ता. जुन्नर) असल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री कोयते उगारून झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे आणि तोडफोडीमुळे भोरवाडी परिसरात प्रचंड घबराट व खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या पूर्ववैमनस्यातून किंवा कारणावरून करण्यात आला, तसेच जमावातील इतर अनोळखी इसम कोण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तळपाडे करत आहेत.
अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी रितिका प्रशांत रजपूत (वय २२ वर्षे, व्यवसायः शेती, रा. भोरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) या आपल्या कुटुंबीयांसह घरी असताना मंगळवारी मध्यरात्री अचानक १० ते ११ जणांचे टोळके हातात कोयते घेऊन घरासमोर आले. या टोळक्याने परिसरात दहशत माजवत घरावर जोरदार दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत घरावरील सिमेंटचे पत्रे फुटून मोठे नुकसान झाले. तसेच घराच्या आवारात उभ्या असलेल्या दोन वाहनांची टोळक्याने बेसुमार तोडफोड केली. यावेळी गोंधळ ऐकून बाहेर आलेल्या रितिका रजपूत यांच्या कानाखाली टोळक्यातील एकाने मारहाण केली, तसेच संपूर्ण कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
Ans: जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी हद्दीतील भोरवाडी (पवार मळा) येथे मंगळवारी, १२ तारखेला मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Ans: १० ते ११ जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन घरावर दगडफेक केली आणि वाहनांची तोडफोड केली. तसेच घरातील महिलेला मारहाण करून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
Ans: या प्रकरणी प्रसाद चिंतामण हिंगे याच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.






