उत्तर प्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केल्याची समोर आले आहे. मृतक मुलीने वडिलांच्या पाकिटातून परवानगीशिवाय ५०० रुपये काढून घेतले म्हणून ही हत्या करण्यात आली. आरोपी वडिलाने गळा दाबून आपल्या निष्पाप लेकीची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत मुलीचं नाव सोनम असे होते. तर आरोपी वडिलांचं नाव अजय शर्मा असे आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना उत्तर प्रदेश येथील बुलंदशहर येथील बिचौली येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम ही सातवीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान, शाळेचा गणवेश परिधान केलेल्या एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. बुलंदशहर पोलीस ठाणे परिसरातील एका पुलाखाली झुडपात मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरणाचा तपास सुरु केला. मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि नांतर ओळख पटवण्यात आली.
कशी केली हत्या?
या प्रकरणाचा तपासादरम्यान, सोनम गुरुवारी शाळेत गेल्याच उघड झालं. तिचे वडील अजय शर्मा दुपारी तिला शाळेत घेण्यासाठी गेले. तेव्हा तिला घरी न नेता तिला शेतात घेऊन गेले. तिथे त्यांनी तिचा स्कार्फने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह कालव्याजवळ फेकून दिला. आरोपी वडिलांच्या महितीवरून पोलिसांनी मुलीच्या शाळेची बॅग शेतातून ताब्यात घेतली.
का केली हत्या?
पोलीस चौकशीत आरोपी वडिलाने सांगितले की मुलगी गेल्या काही दिवसांपासून घरून पैसे घेत होती. त्यामुळे तिच्या पालकांमध्ये वारंवार वाद होत होती. याच संतापाच्या भरात वडिलांनी गळादाबून हत्या केल्याचे स्पष्ट केले.
हत्येनंतर शाळेला खोटी माहिती
हत्येनंतर आरोपी वडिलांनी शाळेला खोटी माहिती दिली, त्यांची मुलगी नातेवाईकांना भेटायला गेली आहे आणि पुन्हा ती तीन ते चार दिवस भेटायला येणार नाही. पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.
लग्न टाळण्यासाठी तरुणीने आखलं फिल्मी षड्यंत्र
उत्तर प्रदेश येथून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने आपलं ठरलेलं लग्न मोडण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा फिल्मी षडयंत्र आखल्याचे समोर आले आहे. या तरुणीने आपल्या चेहऱ्यावर सॉस लावून रक्ताचे डाग असल्याचे भासवत धमकीचे फोटो आणि मेसेज पाठवले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांमध्ये एकाच खळबळ उडाली होती. तिने हे सर्व केवळ ठरलेलं लग्न मोडावं या उद्देशाने केलं होत. परंतु पोलिसांनी जेव्हा या मुलीचा शोध घेता तेव्हा अनेक धक्कदायक बाब समोर आल्या आहेत.